शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War: भारत - पाकिस्तानमधील परिस्थिती सुधारतेय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
2
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
3
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
4
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
5
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
6
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
7
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
8
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
9
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
10
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
11
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
12
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
13
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
14
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
15
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
16
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
17
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
18
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
19
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
20
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू

फेरीवाले सातनंतर पुन्हा रस्त्यांवर

By admin | Updated: July 31, 2016 02:19 IST

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील अतिक्रमणांच्या विरोधात धडक मोहीम सुरू केली आहे.

नवी मुंबई : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील अतिक्रमणांच्या विरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत सर्वप्रथम रस्ते आणि पदपथांवर ठाण मांडून बसलेल्या फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. त्यामुळे पदपथ आणि रस्ते पदचाऱ्यांसाठी मोकळे झाले. परंतु महापालिकेच्या या कारवाईचा पुरता फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. कारण फेरीवाले पुन्हा पदपथांवर दिसू लागले आहेत. विशेषत: सायंकाळी सात वाजल्यानंतर शहरातील बहुतांशी पदपथांवर फेरीवाल्यांनी बस्तान ठोकल्याचे दिसून येते.फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीअभावी शहरात अनधिकृत फेरीवाल्यांचा सुळसुळाट झाला आहे. रस्ते, पदपथ, सार्वजनिक जागा आदींवर फेरीवल्यांनी अतिक्रमण केले. त्यांना स्थानिक नगरसेवक व महापालिकेच्या विभाग कार्यालयांकडून अर्थपूर्ण पाठिंबा मिळाल्याने फेरीवाल्यांच्या समस्येने अक्राळ रूप धारण केले. याचा परिणाम म्हणून माहिती व तंत्रज्ञानाच्या या शहराला बकालपण आले. मनमानी पद्धतीने फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला. वाहतुकीची समस्या उद्भवली. पदचाऱ्यांची गैरसोय होऊ लागली. आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मुंढे यांनी सर्वप्रथम या प्रश्नाला हात घातला. त्यानुसार एकाच वेळी शहराच्या सर्व विभागांतील फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. आपल्या कर्तव्यात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवरच कारवाईची टांगती तलवार ठेवल्याने या मोहिमेला पहिल्यांदाच मूर्तरूप आले. याचा परिणाम म्हणून अवघ्या काही दिवसांतच शहरातील रस्ते व पदपथांनी मोकळा श्वास घेतला. त्यामुळे रहिवाशांनी समाधान व्यक्त केले. असे असले तरी या फेरीवाल्यांनी पदपथ व्यापायला पुन्हा सुरुवात केली आहे. विशेषत: सायंकाळी सात वाजल्यानंतर हे फेरीवाले रस्त्यांवर दिसू लागले आहेत. वाशी सेक्टर ९, १0, सेक्टर १७ या विभागात फेरीवाल्यांनी पुन्हा अतिक्रमण करायला सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे कोपरखैरणे येथील सेक्टर १५ ते १८, सेक्टर २ ते ६ या परिसरात फेरीवाल्यांनी सायंकाळच्या वेळी आपले बस्तान ठोकल्याचे दिसून येते. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.>फेरीवाले पदपथांवर पुन्हा अतिक्रमण करणार नाहीत, याची जबाबदारी संबंधित विभाग अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. मात्र त्यानंतरही अनेक विभागांत फेरीवाल्यांनी पुन्हा पदपथ आणि रस्ते व्यापल्याचे दिसून येते. सायंकाळच्या वेळी वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, नेरूळ, बेलापूर, तुर्भे, सानपाडा आदी परिसरांतील रस्ते आणि पदपथांवर पुन्हा फेरीवाले दिसू लागले आहेत.