शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदी हावरे

By admin | Updated: July 23, 2016 04:15 IST

साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी नवी मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि भाजपाचे नेते सुरेश हावरे यांची नियुक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

यदु जोशी,

मुंबई- शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी नवी मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि भाजपाचे नेते सुरेश हावरे यांची नियुक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. हावरे हे भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य आहेत. त्याआधी ते भाजपाचे ठाणे विभागीय अध्यक्ष होते. २००९ मध्ये त्यांनी तत्कालिन मंत्री गणेश नाईक यांच्याविरुद्ध विधानसभेची निवडणूक लढविली होती. ते मूळचे अमरावतीकर असले तरी नवी मुंबई, ठाणे परिसरात त्यांनी मोठे बांधकाम विश्व उभारले आहे. त्यांनी केमिकल इंजिनियरिंगमधून पदवी संपादन केली असून न्युक्लिअर इंजिनियरिंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. परवडणारी घरे या विषयावर ते सध्या मुंबई विद्यापीठात पीएचडी करीत आहेत. आघाडी सरकारच्या काळात श्रीरामपूरचे तत्कालीन काँग्रेस आमदार जयंत ससाणे हे संस्थानचे अध्यक्ष होते. आधी धर्मादाय आयुक्तांच्या नियंत्रणात असलेले हे संस्थान २००४ पासून राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली आले. तेव्हापासून मुख्यमंत्री हे अध्यक्ष व विश्वस्तांची नेमणूक करू लागले. २००४ ते २०१२ या काळात ससाणे हेच अध्यक्ष होते. न्यायालयीन याचिकेनंतर विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आले. त्यानंतर लगेच तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ससाणे यांना पुन्हा अध्यक्षपदी नेमले. न्यायालयाने नंतर पुन्हा विश्वस्त मंडळ बरखास्तीचे आदेश दिले. तेव्हापासून तीन सदस्यीय प्रशासकीय मंडळ संस्थानचा कारभार करते. त्यात जिल्हाधिकारी, जिल्हा न्यायधीश आणि संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा समावेश आहे. आता हावरे यांच्या अध्यक्षतेखाली नवीन विश्वस्त मंडळाची घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.