शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

काकांना पुतण्याची इतकी भीती कधीपासून वाटतेय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 05:31 IST

काका राज ठाकरे यांना पुतण्या आदित्यची इतकी भीती कधीपासून वाटू लागली, एखादा युवक राज्याच्या हितासाठी चांगले काम करतोय तर कौतुक करायचे सोडून राजकीय टीका कसली करताय

मुंबई : काका राज ठाकरे यांना पुतण्या आदित्यची इतकी भीती कधीपासून वाटू लागली, एखादा युवक राज्याच्या हितासाठी चांगले काम करतोय तर कौतुक करायचे सोडून राजकीय टीका कसली करताय, अशा शब्दात पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सोमवारी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. प्लॅस्टिकबंदीविरोधात मनसेने थेट मातोश्रीबाहेर बॅनरबाजी केल्यामुळे रामदास कदम यांनी थेट राज ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली.मंत्रालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत रामदास कदम म्हणाले की, प्लॅस्टिकबंदीचा निर्णय गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये घेतला गेला होता. लोकांना वेळ मिळावा यासाठी सहा महिन्यांचा त्यांना अवधी दिला होता. शिवाय, उच्च न्यायालयानेही आणखी तीन महिने मुदत वाढवून दिली होती. या कालावधीत राज्यभर विविध माध्यमातून प्लॅस्टिकबंदीबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. गावखेड्यातील बस स्टँडवरही सरकारने जाहिराती दिल्या. एखाद्या राजकीय नेत्याला, पक्षाला याची माहिती नसेल तर ते त्यांचे अपयश आहे, असेही कदम यांनी सांगितले.राज्यभरातून प्लॅस्टिकबंदीचे स्वागत होत आहे. राज्याच्या हितासाठी सर्वांनाच काही सवयी बदलाव्या लागतील. राज ठाकरे कधी बाजारात जात नाहीत त्यामुळे त्यांना यातले काही दिसत नाही. प्लॅस्टिकला पर्यायी वस्तूंचे १२० स्टॉल वरळीत लागले आहेत, अशा शब्दात रामदास कदम यांनी मनसे आणि राज यांचा समाचार घेतला.दंडाच्या रकमेबाबत बोलताना ्नरामदास कदम म्हणाले की, नाईलाजाने मोठ्या रकमेच्या दंडाची तरतूद करावी लागली. इतके दिवस बंदी असलेल्या प्लॅस्टिकच्या वापरासाठी केवळ २००-३०० इतका दंड होता. त्यामुळे कुणाला कायद्याचा धाकच नव्हता. बंदीची प्रभावी अंमलबजावणीच राज्यात झाली नाही. यावर अन्य राज्यांचा अभ्यास करूनच पाच हजार ते २५ हजार इतक्या दंडाची तरतूद करण्यात आल्याचे कदम यांनी स्पष्ट केले.नॉन ओव्हन पिशव्यांवरही बंदीकापडी पिशवीच्या नावाखाली सध्या बाजारात नॉन ओव्हन पिशव्या आणल्या जात आहेत. या पिशव्यांवरही बंदी आहे. त्यामुळे कारखानदारांनी ताबडतोब त्यांचे उत्पादन थांबवावे. उद्यापासून अशा कारखानदारांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे कदम यांनी स्पष्ट केले.रोजगार बुडल्याचा आरोप चुकीचानऊ महिन्यांपासून प्लॅस्टिकबंदीचा विषय सुरू आहे. शिवाय, राज्यातील एकूण प्लॅस्टिकपैकी फक्त २० टक्के प्लॅस्टिकची महाराष्ट्रात निर्मिती होते. उर्वरित प्लॅस्टिक गुजरातमधून महाराष्ट्रात येते. त्यामुळे महाराष्ट्रात रोजगार बुडाल्याच्या आरोपात तथ्य नसल्याचे कदम म्हणाले.