शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांच्या मानसिकतेला सलाम, एटीएम झाले कचराकुंडी

By admin | Updated: October 27, 2016 15:46 IST

सध्या दिवाळीच्या खरेदीसाठी प्रत्येकजण एटीएमवर पैसे काढण्यासाठी जात आहेत. पैसे काढल्यानंतर स्लीप मात्र तेथेच फेकून देण्यात येत असल्यामुळे एटीएमला कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाले

ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा, दि. 27  : सध्या दिवाळीच्या खरेदीसाठी प्रत्येकजण एटीएमवर पैसे काढण्यासाठी जात आहेत. पैसे काढल्यानंतर स्लीप मात्र तेथेच फेकून देण्यात येत असल्यामुळे एटीएमला कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.  शहरातील प्रत्येक चौकामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांचे एटीएम केंद्र आहे. शहरामध्ये ३० पेक्षा अधिक एटीएम केंद्र असून या एटीएम केंद्रांमध्ये एैन दिवाळीच्या तोंडावरच अनेक नागरिक पैसे काढण्यासाठी जात आहे. दुसरीकडे काही एटीएममध्ये पैसे नसल्यामुळे नागरिकांना खाली हात जावे लागत आहे.

जिल्ह्यातील मेहकर, लोणार, सिंदखेडराजा, चिखली, मोताळा या शहरातील बहुतांश एटीएम केंद्रावर पाहावयास मिळत आहे.  शासकीय तसेच निमशासकीय कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतन, नियमित वेतन आणि बोनस दिवाळीनिमित्त दिलेला आहे.या रकमा कर्मचाऱ्यांच्या वेतन खात्यात जमा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक कर्मचारी दिवाळीच्या खरेदीसाठी लागणारे पैसे काढण्याकरिता एटीएमवर धाव घेत आहे. त्यामुळे एटीएमवर ताण पडत आहे. बुधवारी सायंकाळीचशहरातील बहुतांश एटीएममध्ये रोकड संपल्यांमुळे ग्राहकांची धांदल उडाली.

पैसे असलेल्या एटीएम केंद्रांचा शोध घेत ग्राहक फिरत होते. शहरातील काही केंद्रांवर गुरूवारी सकाळी मोठ्या रांगा पाहावयास मिळाल्या. मात्र, काही तासातच त्या एटीएमवरही पैशाचा ठणठणाट जाणवला. त्यामुळे अनेकांनी बँकेत गर्दी केली. परंतू, बँकेतही ग्राहकांची संख्या वाढल्याने काही ग्राहकांना पैसे न घेताच माघारी परतावे लागले. त्यामुळे अनेक ग्राहकांना दिवाळीखरेदी ऊसनवारीवर भागवावी लागत आहे.ग्रामीण भागातील नागरिकही परतलेशहरापाठोपाठ ग्रामीण भागातील नागरिकही एटीएमचे ग्राहक आहेत. दिवाळीची खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक शहरातील एटीएमवर पैसे काढू या उद्देशाने शहरात येतात. शहरातील एटीएमच्या भरवश्यावर आलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना येथील बंद एटीएममुळे माघारी परतावे लागत आहे. त्यामुळे अनेक नागरिक बंद एटीएममुळे दिवाळीची खरेदी न करताच गावाकडे परत गेले.