शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

पांढुर्णा येथील गोटमारीत ३७५ जखमी, तीन गंभीर, अघोऱ्या परंपरेसमोर प्रशासन हतबल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 22:54 IST

मध्यप्रदेशातील पांढुर्णा येथे पोळ्याच्या करीला जांब नदीच्या पात्रातील गोटमार यात्रेत मंगळवारी तब्बल ३७५ भाविक जखमी झालेत, तर तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. पांढुर्णा आणि सावरगावचे नागरिक प्रेम कहाणीच्या दंतकथेच्या आधारे ही पारंपरिक गोटमार करीत असते.

 पांढुर्णा, दि. 22 - मध्यप्रदेशातील पांढुर्णा येथे पोळ्याच्या करीला जांब नदीच्या पात्रातील गोटमार यात्रेत मंगळवारी तब्बल ३७५ भाविक जखमी झालेत, तर तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. पांढुर्णा आणि सावरगावचे नागरिक प्रेम कहाणीच्या दंतकथेच्या आधारे ही पारंपरिक गोटमार करीत असते. या गोटमारीत काही वाहनाची तोडफोउ झाली असून एका रुग्णवाहिकेलासुध्दा फटका बसला. यामुळे मध्यप्रदेश पोलिसांनी लाठीचार्ज करून अश्रूधुराचे नळकांडे फोडले. 

वरुडपासून मध्यप्रदेशात ३५ किमी अंतरावर असलेल्या पांढुर्णा येथे शेकडो वर्षांपासून पोळ्याच्या करीला गोटमार यात्रा भरत असते. ही यात्रा ३०० वर्षांपूर्वीच्या आख्यायिकेवर आधारित आहे. आजही शेकडो वर्षांची पंरपरा जोपासण्यात येते. गोटमार यात्रेला सुरुवात होण्यापूर्वी भाविक सूर्योदयापूर्वी जांब नदीच्या पात्रात पळसाचे भले मोठे वृक्ष लावून त्यावर झेंडा लावतात. वाजंत्रीच्या तालावर पूजा अर्चा झाली की गोटमार यात्रेला सुरुवात होते. मध्यान्नानंतर या यात्रेला चांगली रंगत चढते. विदर्भासह मध्यप्रदेशातील कानाकोपºयातून ही गोटमार यात्रा पाहण्यास भाविकांची मोठी गर्दी होेते. अखेर दोन्ही गावातील नागरिकांच्या तडजोडीने सूर्यास्तानंतर झेंडा चंडीदेवीच्या मंदिरात आणून विधीवत पूजा केली जाते. यावर्षी गोटमार यात्रेमध्ये दगडफेकीच्या धुमश्चक्रीत ३८० भाविक जखमी झाले. तर वंसत केशव काळे ३२ रा. मारुड, राजेश चैतराम ढोमणे (२८, रा. तिगाव), रामा देवराव कुमरे (२२, रा. कळमेश्वर)  हे तीन गंभीर जखमी झाल्याने नागपूरला उपचाराकरिता पाठविण्यात आल्याचे आरोग्य प्र्रशासनाकडून सांगण्यात आले.     प्रशासनाचे प्रयत्न निष्प्फळ !ही प्रथा बंद करण्याकरिता प्रशासनाने अनेकदा दोन्ही गावांतील नागरिकांची समजूत घातली. चार वर्षांपूर्वी दगडांऐवजी रबरी बॉलसुध्दा दिले. तरीसुध्दा प्रशासनाला न जुमानता ही गोटमार यात्रा अव्याहतपणे सुरूच आहे.