शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

हसनैनला व्यवसायात दगा?

By admin | Updated: March 1, 2016 03:29 IST

वडवली हत्याकांड प्रकरणातील हसनैन वरेकर याने व्यवसायात दग्याफटक्याच्या नैराश्यातून आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सूर्यकांत वाघमारे,  नवी मुंबईवडवली हत्याकांड प्रकरणातील हसनैन वरेकर याने व्यवसायात दग्याफटक्याच्या नैराश्यातून आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर त्याचा बहिणी व भाच्यांवर खूप जीव असल्याने आपल्या पश्चात त्यांच्यावर वाईट दिवस येऊ नयेत, यासाठी त्यांनाही जीवे मारल्याची शक्यता व्यक्त होत आहे.काही वर्षांपूर्वी हसनैनने नोकरीसाठी विदेशात जायची इच्छा वडिलांकडे व्यक्त केली होती. परंतु चार मुली व तो एकुलता मुलगा असल्याने वडिलांनी त्याला इथेच नोकरी करून कुटुंबासोबत राहण्याचे सुचवले होते. त्यानुसार काही वर्षे ठाणे येथे काम केल्यानंतर तो तुर्भेतील एका कंपनीत सुमारे ३५ ते ४० हजार पगाराची नोकरी करीत होता. दरम्यान, काही महिन्यांपासून त्याची सुपारीचा एक्सपोर्ट- इनपोर्ट व्यवसाय करण्याची इच्छा होती, असे घटनेत मृत पावलेल्या शबिना यांचे पती शौकत खान यांनी सांगितले.हसनैनने कुटुंबातल्या मोजक्याच सदस्यांना याबाबत सांगितले होते. या व्यवसायासाठी त्याने ओळखीच्या व्यक्तींकडून २० ते ३० लाख रुपये घेतले होते. परंतु काही कारणाने हसनैनच्या नावावर तो व्यवसाय सुरू होणार नसल्याने त्याच्याच ओळखीच्या ज्या व्यक्तीच्या नावे हा व्यवसाय होणार होता, त्याच्याकडे हसनैनने लाखो रुपये दिले होते, असेही समजते. त्यांच्यातील याच व्यवहारातून हसनैनला २० ते २५ लाख रुपये मिळणार होते. कदाचित हीच रक्कम मिळाली नसावी, याच्या तणावामुळे आत्महत्या केल्याची शक्यताही शौकत यांनी व्यक्त केली आहे. परंतु चारही बहिणी व भाच्यांवर त्याचे खूप प्रेम होते. विवाहित बहिणींच्या भेटीला तो कधीच रिकाम्या हाताने जात नव्हता. यामुळेच खैरणेत या भाऊ-बहिणींच्या प्रेमाची चर्चा होती. परंतु आपल्या पश्चात बहिणी व भाच्यांचे काय होईल, या चिंतेनेही त्याने स्वतच्या कुटुंबासोबत बहिणी व भाच्यांची हत्या केली असावी, अशीही शक्यता शौकत खान यांनी व्यक्त केली आहे. अनेक वर्षांपासून हसनैन हा त्याच्या नातेवाइकांना दावतसाठी घरी बोलवायचा. घटनेच्या दोन दिवस अगोदर मात्र त्याने केवळ बहिणींना बोलावले होते. त्यामुळे हसनैनची बँक खाती, घटनेपूर्वीचे फोन संभाषण यांची तपासणी करण्याची मागणी मयत मारिया यांचे दीर अश्फाक फक्की यांनी केली आहे.