शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
2
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
3
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
4
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर
5
विजयाशिवाय मागे हटणार नाही, सरकारने सहकार्य केले, आपणही सहकार्य करू : जरांगे पाटील
6
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
7
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
8
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
9
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
10
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
11
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
12
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
13
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
14
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
15
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
16
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
17
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
18
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
19
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
20
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका

स्मृती गेली?

By admin | Updated: November 26, 2014 00:01 IST

मालवणी तडका

सकलो : स्मृती क शी गेली रे? खय पडलस बिडलस की काय?तुकलो : मी कित्या खय पडान? आनी पडल्यार स्मृती जाता की काय?सकलो : खय तरी डोक्याबिक्या आपाटला, तर स्मृती जात मरे. तसा काय झाला की काय तुझा?तुकलो : माझा कित्या काय व्हतला?सकलो : तर कोनची स्मृती गेली?तुकलो : इरानीची स्मृती गेली. सकलो : इरानीची स्मृती गेली? म्हंजे नेमक्या काय झाला? खयल्या इरानीची स्मृती गेली? आनी कशी काय गेली? तुकलो : अरे बाबा, स्मृती इरानी आपली कें द्रीय मनुुष्यबळ विकास मंत्री. सकलो : तिचीच स्मृती गेली?तुकलो : अरे बाबा ती ज्योतिषाकडे गेली. सकलो : जायना. तुझ्या बापाशीचा काय झाला? ती ज्योतिषाकडे जायत नायतर आनखी कोनाकडे जायत. तुमचो काय संंबंध व ती करता काय, खय जाता, कित्या जाता ह्या तुमी कित्या बघतास?तुकलो : अरे बाबा ती नुसती स्मृती इरानी न्हय. तर ती आपल्या देशाची मनुष्यबळ विकास मंत्री हा. सकलो : म्हंजे आदी आपल्यात किती बळ हा, ह्या बघूक गेलली. तुकलो : म्हंजे तू तिचा समर्थन करतस? सकलो : एस. व्हाय नॉट? अरे पोलीस अधिकारी दाभोलकरांच्या खुनाचो तपास करूक प्लॅनचेअचो वापर करीत आसात, तर ही तर मंत्री. तिना संत्री चावान खाली काय आनी सोलून खाली काय दोनव सारक्या. तुकलो : म्हंजे?सकलो : आपल्या लोकशाहीत निवडान येनाऱ्याक शिक्षनाची अट नाय. नोकरीक लागनाऱ्याक शिक्षन व्हया. तुकलो : म्हंजे तुझी स्मृती जागृत झाली तर. सकलो : कसली?तुकलो : स्मृतीचा शिक्षन कायतरी कमी हा म्हनतत. सकलो : शिक्षन म्हत्त्वाचा नाय हय. संस्कार म्हत्त्वाचो. अरे शिक्षनान हाली कोनाचा भला झाला हा?तुकलो : ताव खराच म्हना. शिक्षनान तसा खय कोनाचा भला झाला? पन बरा वायट समजाचेसाठी शिक्षन ह्या व्हयाच. सकलो : निवडान येवचेसाठी शिक्षन लागता?तुकलो : गरज नाय. सकलो : तेचेच हे दुष्परिनाम असा तुका वाटना नाय?तुकलो : कशावरून?सकलो : अरे तूच सांगतस देशाची मनुष्यबळ विकास मंत्री ज्योतिषाकडे गेली आनी हात दाखवल्यान. तुकलो : हाताचा मी तुका खय काय सांगलय? हातवाले बॉब मारतत ह्या मातर खरा हा. सकलो : तेंचा कामच हा बॉब मारूचा. हेचे आदी कमळाबाई बॉब मारी व्हती. आता सोनियाबाई बॉब मारतली. तुकलो : तो राजकारनाचो भाग झालो. पन तू माका सांग, ज्योतिषाकडे जाना म्हंजे अंधश्रध्देक खतपानी घालना. असा व्हना नाय?सकलो : व्हेरी नाईस! आत तू खरो झेंगाट करूक इलस. तू आवशी बापाशीच्या ‘पाया’ पडतस मा? देवाच्या पाया पडतस मा? नारळ-अगरबत्ती लावतस मा? तुकलो : तेचो काय संबंध?सकलो : ती सुध्दा अंधश्रध्दाच. तुकलो : आवशीचो घोव तुझ्या. आवशी बापाशीच्या पाया पडना म्हंजे अंधश्रध्दा?सकलो : व्हय. सेवा करा. पाया पडाची नाटका कित्या करतास? करूची हा तर सेवा करा. तुकलो : खरा हा. पन देशाची मंत्री ज्योतिषाक हात दाखवता म्हंजे काय?सकलो : अरे हस्तरेषा बघून ती राष्ट्रपती व्हतली, असा तिका ज्योतिषान सांगला तर वायट काय? तुकलो : अरे असो काय? तू तिची कशी काय बाजू घेतस?सकलो : अरे बाबा, आपून राष्ट्रपती व्हतलय, म्हनान ती खुशीत रवतली आनी देशाच्या मनुष्यबळाचो विकासच व्हतलो. तुकलो : आता मातर माझी स्मृती जावची येळ इली. पन तुमी खयच जाव नुको. उद्या ह्याच येळाक ह्याच ठिकानी आमची नयी कोरी स्मृती येतली. तवसर ह्याच स्मृतीत रवा. - विजय पालकर