शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

हरियाणाच्या गुंडाचे मुंबईत ‘एन्काउंटर’

By admin | Updated: February 8, 2016 04:42 IST

हरियाणात आठ खुनांसह एकूण ३६ प्रकरणांत हवा असलेला नामचीन गुंड संदीप गदोली (रा. गुडगाव) रविवारी सकाळी अंधेरीतील एका हॉटेलात तेथील पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाला

डिप्पी वांकाणी,  मुंबई हरियाणात आठ खुनांसह एकूण ३६ प्रकरणांत हवा असलेला नामचीन गुंड संदीप गदोली (रा. गुडगाव) रविवारी सकाळी अंधेरीतील एका हॉटेलात तेथील पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाला. या वेळी गदोलीने केलेल्या गोळीबारात हरियाणाचे दोन पोलीस जखमी झाले. गदोलीवर १.२५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर झालेले होते. गुडगाव गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आम्हाला कोणतीही पूर्वसूचना न देता परस्पर ही कारवाई केली, असे मुंबई पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र मुंबई पोलिसांना आम्ही या कारवाईची आधीच माहिती दिली होती, असा दावा गुडगाव पोलिसांनी केला. दरम्यान, मुंबईचे पोलीस आयुक्त दत्तात्रेय पडसलगीकर यांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास रविवारी रात्री गुन्हे शाखेकडे सोपविला.गुडगावचे पोलीस निरीक्षक अमित कौहर यांनी सांगितले की, सकाळी ११च्या सुमारास गुडगाव गुन्हे शाखेच्या पोलिसांची आठ जणांची तुकडी अंधेरीत (पूर्व) एमआयडीसीतील एअरपोर्ट मेट्रो हॉटेलमध्ये गेली. आम्ही गदोलीच्या शोधात अगदी गुडगावपासून होतो. शुक्रवारी आधी आम्ही भिवंडीत गेलो. तेथे आम्हाला तो जयपूरला गेल्याचे कळाले. तेथे आम्हाला तो मुंबईत असल्याची निश्चित माहिती समजली. त्यानुसार आम्ही त्याला हॉटेलमध्ये अटक करण्याची तयारी केली होती. गदोलीने पळून जाण्याचा प्रयत्न केला तर लगेच पकडता यावे यासाठी आमच्यापैकी तिघे जण हॉटेल परिसरात लक्ष ठेवून होते. एके-४७, पिस्तुले आणि रिव्हॉल्व्हरसह आमच्या तुकडीतील पाच जण हॉटेलच्या तळमजल्यावरील खोलीकडे गेले. गदोली तेथे एका मुलीसह होता. त्याने दार उघडले व आमचे लोक बघताच त्याने जबरदस्तीने दार लावण्याचा प्रयत्न केला व त्यांच्या दिशेने त्याने गोळ्याही झाडल्या. त्यातील एक गोळी पोलीस शिपाई परमजितच्या (४०) कानशिलाला खेटून गेली. दुसरी गोळी शिपाई विक्रमसिंग (३०) याच्या पायाला लागली. कौहर म्हणाले की, आमच्या पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात गदोली जखमी झाला. त्याला कूपर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले तेथे दुपारी १२.५५ च्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्याच हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरील जयपूरहून गदोलीसोबत आलेले त्याचे दोन मित्र व दोन विदेशी मुलींसह राहात होते. या कारवाईची माहिती आम्ही स्थानिक पोलिसांना दिली होती, असेही कौहर म्हणाले.अमित कौहर म्हणाले की,‘‘संदीप गदोलीने हॉटेलमध्ये राहण्यासाठी रिषभ सिंगच्या नावाने बनावट ओळखपत्र बनवून खोली बुक केली होती. आम्ही त्याची स्कॉर्पियो कार (एचआर-२६ सीजे ५८९५) हॉटेलच्या कुंपणाच्या आता उभी केलेली बघितली होती. आमची माहिती योग्य होती हे निश्चित झाल्यावर आम्ही सशस्त्र होऊन हॉटेलमध्ये गेलो.’’मुंबई पोलिसांच्या विभाग १० चे उपायुक्त विनायक देशमुख यांनी सांगितले की,गुडगाव पोलिसांच्या तक्रारीवरून खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा आम्ही संदीप गदोलीविरुद्ध दाखल केला आहे. आम्ही हॉटेलमधील त्याच्या खोलीतून पिस्तूल आणि काही रोख रक्कम ताब्यात घेतली आहे. अशा कारवाईची माहिती त्यांनी आम्हाला आधीच द्यायला हवी होती परंतु त्यांनी तसे केले नाही. नियंत्रण कक्षाला कळविल्याचे ते सांगत असले तरी त्याची आम्ही खातरजमा करून घेत आहोत. आम्ही त्या मुली आणि त्याच्या साथीदारांचे म्हणणेही नोंदवून घेत आहोत. आम्ही हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले आहे.सलग तीन दिवस प्रवासआपण भिंवडीतच त्याला अटक करू असा विचार गुडगाव पोलिसांनी केला होता. त्यामुळे मागचे दार जाळीचे असलेल्या कारने ते प्रवास करीत होते. हॉटेलवर छापा घातलेल्या तुकडीतील पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की आम्ही सलग तीन दिवस प्रवास करीत होतो व तरीही आम्ही मुंबईला पोहोचू, असे वाटले नव्हते.तीन खोल्यांची बुकिंगसंदीप गदोली आणि त्याच्या साथीदारांनी एअरपोर्ट मेट्रो स्टेशनजवळील हॉटेलमध्ये तीन खोल्या बुक केल्या होत्या. या हॉटेल्समध्ये विदेशी लोकांनीही खोल्या बुक केल्या होत्या.