नवे पारगाव : नवे पारगाव -विनयनगर (ता. हातकणंगले) येथील तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकॅडमीच्या मैदानावर झालेल्या ६०व्या १९ वर्षांखालील शालेय व्हॉलिबॉल स्पर्धेत मुलांच्या व मुलींच्या गटांत हरियाणाने अजिंक्यपद मिळवून सुवर्णपदक पटकाविले. मुलींच्या गटात तमिळनाडूने व मुलांच्या गटात पंजाबने रौप्यपदक पटकाविले. मुलींच्या गटात केरळ, तर मुलांच्या गटात तमिळनाडूने कांस्यपदक पटकावले.क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, कोल्हापूर व वारणा विभाग शिक्षण मंडळ यांच्यावतीने स्पर्धेचे आयोजन केले होते. वारणा शिक्षण मंडळाचे सचिव जी. डी. पाटील, प्राचार्य टी. बी. ऱ्हाटवळ, शिक्षण उपसंचालक एन. बी. मोटे, शामराव गोरोलीकर, क्रीडाधिकारी नवनाथ फरताडे यांच्या हस्ते झाले.तिसऱ्या क्रमांकासाठी मुलांच्या गटात तमिळनाडूने केरळवर ३-१ सेटस्ने २५-२०, २२-२५, २५-१६ ने विजय मिळविल्याने कांस्यपदक मिळाले. मुलींच्या गटात केरळने महाराष्ट्रविरुद्ध तीन सेटस्ने सामना जिंकला. एक व दोन क्रमांकासाठी मुलांच्या गटात हरियाणा विरुद्ध पंजाब यांच्यात अत्यंत चुरशीने सामना झाला. हरियाणाचा कर्णधार सोनुखान, विनोद, सौरभ, रोहित यांच्या उत्कृष्ट स्मॅश, ब्लॉकिंग सर्व्हिसवर पंजाबला पहिल्यापासून आपल्या दबावाखाली ठेवत २३-२३, २५-१९ अशा तीन सेटस्नी सामना जिंकून स्पर्धेतील अजिंक्यपद पटकावले.मुलींच्या गटातील अंतिम सामना हरियाणा विरुद्ध तमिळनाडूमध्ये झाला. हरियाणाने तमिळनाडूवर २५-१८, २२-२५, २५-२०, २५-१६ अशा सेटस्ने मात करून सुवर्णपदक मिळविले. तमिळनाडूने केरळवर तीन सेटस्ने मात करून रौप्यपदक पटकाविले. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात केरळने महाराष्ट्रवर तीन सेटस्ने मात केली.स्पर्धेत ५६ संघांनी भाग घेतला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सचिव जी. डी. पाटील, प्राचार्य टी. बी. ऱ्हाटवळ, प्रा. शेषण, गंगाधारण, प्रा. के. जी. जाधव, उदय जाधव, उदय पाटील, तिरुज्ञान सम्पद, राजू मुजावर, साहेबराव ठाकरे, एम. टी. देसाई, आंतरराष्ट्रीय पंच अजित पाटील, एल. जी. पवार, नवनात फरताडे, आदींनी परिश्रम घेतले.नवे पारगाव येथील राष्ट्रीय व्हॉलिबॉल स्पर्धेत सुवर्णपदकाचे मानकरी ठरलेल्या हरियाणाच्या मुलींच्या संघांना चषक देताना क्रीडा उपसंचालक एन. बी. मोटे, सचिव जी. डी. पाटील, प्राचार्य ऱ्हाटवळ, अजित पाटील, के. जी. जाधव, साहेबराव ठाकरे, उदय जाधव.
हरियाणाला दुहेरी मुकुट
By admin | Updated: December 31, 2014 23:58 IST