शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
2
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
3
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
4
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
5
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
6
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
7
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
8
असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
9
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
10
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
11
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
12
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
13
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
14
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
15
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
16
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
17
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
18
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
19
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
20
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील

‘टोळी’वर उतारा ‘हार्वेस्टर’चा !

By admin | Updated: December 6, 2015 02:29 IST

ऊसतोडणीसाठी लागणाऱ्या टोळीवर उतारा म्हणून आता ‘हार्वेस्टर’चा वापर वाढला आहे. ऊसतोडणीचा अनेक वर्षांपासूनचा प्रश्न त्यामुळे काही प्रमाणात सुटला आहे.

- शेषराव वायाळ,  परतूर (जि.जालना)

ऊसतोडणीसाठी लागणाऱ्या टोळीवर उतारा म्हणून आता ‘हार्वेस्टर’चा वापर वाढला आहे. ऊसतोडणीचा अनेक वर्षांपासूनचा प्रश्न त्यामुळे काही प्रमाणात सुटला आहे.शेतकऱ्यांना ऊसतोडीसाठी एकमेव मार्ग असतो, ऊसतोड कामगारांचा. एका टोळीत १० कामगार असतात. ऊसतोडीला एका टोळीसाठी ५ ते ६ लाख रुपये मोजावे लागतात. मात्र टोळ्या मिळण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते. टोळी मिळाल्यानंतर शेतकरी मोकळा श्वास घेतो. ऊसतोड टोळ्या साखर कारखान्याकडून पैशांची उचल घेतात. त्यात मध्यस्थी म्हणून पुन्हा एक मुकादम असतो. कारखाना सुरू होण्याच्या काळात टोळ्यांची जुळवाजुळव करून मुकादम कारखान्याच्या ताब्यात देतो. टोळ्यांची खाण्याची, राहण्याची व्यवस्था करायची. त्यात पुन्हा टोळ्या पळून जाणे, शेतकऱ्यांच्या चढाओढीतून त्यांची पळवापळवी, ऊसमालकाने पुन्हा रोख पैसे किंंवा उसाचे वाढे टोळीलाच देणे असे अनेक प्रश्न सोडवावे लागतात.साखर कारखान्याचे प्रश्न, राजकारण आदी अडचणींमुळे ऊसलागवड म्हणजे बरेचदा डोकेदुखी होते. टोळी प्रश्नावर ऊसउत्पादकांना ‘हार्वेस्टर’ हे एक प्रकारे वरदान ठरले आहे.त्यामुळे ऊसतोडणीची समस्या बऱ्याच प्रमाणात सुलभ झाली आहे. कारखाना सुरू झाल्यानंतर होणारी शेतकऱ्यांची धावपळ त्यामुळे थांबली आहे. आपला संपूर्ण ऊस कारखान्यावर वेळेवर जाणार, याची खात्री शेतकऱ्यांना या यंत्रामुळे वाटू लागली आहे. दिवसाला ५० टन तोडएक हार्वेस्टर दिवसात ५० ते ५५ टन ऊस तोडतो. एक टोळी दिवसाला ११ ते १२ टन ऊस तोडते. हार्वेस्टरने काढलेल्या उसाचे पाचट जाळण्याची गरज नसते. त्याचे खत होते. हार्वेस्टरमुळे टोळ्यांचे काम ५० टक्क्यांवर आले आहे. कारखान्याला ३०० टोळ्या लागायच्या. परंतु सध्या कारखान्याकडे १३४ टोळ्या आहेत. हार्वेस्टर यंत्रामुळे शेतकऱ्यांची व कारखान्याची अडचण दूर झाली आहे. - शिवाजीराव जाधव, चेअरमन, बागेश्वरी साखर कारखाना