शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
4
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
5
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
6
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
7
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
8
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
9
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
10
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
11
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
12
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
13
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
14
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
15
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
16
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
17
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
18
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
19
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
20
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका

हर्षवर्धन पाटील यांची होणार चौकशी

By admin | Updated: December 31, 2014 02:23 IST

कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचारप्रकरणी तत्कालीन सहकारी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि इतरांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे खुली चौकशी करण्यास राज्याच्या गृहविभागाने मंगळवारी परवानगी दिली़

धुळे बँक भ्रष्टाचार प्रकरण : राज्याच्या गृहविभागाने दिली मान्यता यदु जोशी- मुंबईधुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचारप्रकरणी तत्कालीन सहकारी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि इतरांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे खुली चौकशी करण्यास राज्याच्या गृहविभागाने मंगळवारी परवानगी दिली़विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की, गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अमिताभ राजन यांनी खुल्या चौकशीच्या फाईलवर स्वाक्षरी केली असून, ती पुढील मान्यतेसाठी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्याकडे पाठवण्यात आली आहे़धुळे जिल्हा बँकेने १४४ कोटी रुपयांचे नियमबाह्ण कर्ज वाटप केले़ या कर्जाची वसुलीदेखील होत नाही़ ज्या संस्थांना कर्ज दिले़ त्यातील बऱ्याच डबघाईला आलेल्या होत्या, या आशयाची तक्रार धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक प्रविण दीक्षित यांच्याकडे केली होती़ आमदार गोटे हे तेलगी प्रकरणात वादग्रस्त ठरले होते़ हर्षवर्धन पाटील यांच्याकडे आपण बँकेतील गैरव्यवहाराच्या अनेक तक्रारी केल्या आहेत़ पण त्याची दखल घेण्यात आलेली नाही़ उलट पाटील यांनी घोटाळ्यांना संरक्षण देण्याची भूमिका घेतली, असे गोटे यांचे म्हणणे होते़ माजी मंत्री अमरीश पटेल यांच्याशी संबंधित प्रियदर्शनी कॉटन को़ आॅप़ सोसायटीला ती तोट्यात असताना १६६ कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आल़े़ तसेच अमोदा आॅईल सीडस् सोसायटीला साडेचार कोटी कर्ज देण्यात आले़ घोटाळ्यासंदर्भात माजी आमदाराने केली होती तक्रारभ्रष्टाचाराचे आरोप असतानादेखील धीरज चौधरी यांना बँकेच्या व्यवस्थापकपदी नेमण्यात आले, असे आरोप गोटे यांनी केले होते़ बँकेच्या घोटाळ्यासंदर्भात त्यांनी माजी आ़ राजवर्धन कदमबांडे तसेच बँकेच्या सात संचालकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होत़े या आरोपांची तपासणी करुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खुल्या चौकशीची परवानगी गृहविभागाकडे मागितली होती़ त्याला मंगळवारी अतिरिक्त मुख्य सचिव अमिताभ राजन यांनी मंजुरी दिली़