शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस मारहाणप्रकरणी आमदार हर्षवर्धन जाधवांना 2 वर्षांची शिक्षा

By admin | Updated: January 6, 2017 14:58 IST

शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना दोन गुन्ह्यात जिल्हा सत्र न्यायालयाने प्रत्येकी 1 वर्षाची शिक्षा आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे

ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. 6 -  शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना दोन गुन्ह्यात जिल्हा सत्र न्यायालयाने प्रत्येकी 1 वर्षाची शिक्षा आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी आमदार हर्षवर्धन जाधव यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
 
 
काय आहे नेमके प्रकरण?
5 जानेवारी 2011 मध्ये मनसे पक्षाचे आमदार असताना हर्षवर्धन जाधव आणि पोलीस यांच्यात राडा झाला होता. यावेळी पोलिसांनी त्यांना बेदम मारहाण केल्याचा जाधव यांनी केला होता. अजिंठा वेरुळच्या दौ-यावर असलेल्या तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन गारपीटग्रस्त शेतक-यांना मदत मिळण्यासाठी निवेदन देण्याचा प्रयत्न जाधव करत होते. 
(हर्षवर्धन जाधव यांच्यावर 40 गुन्हे)
 
यावेळी जाधव यांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात गाडी घुसवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पोलिसांनी केला होता. यानंतर पोलीस आणि हर्षवर्धन जाधव यांच्यात वाद झाला. यादरम्यान, पोलिसांवर हात उगारल्याचा आरोप हर्षवर्धन जाधवांवर आहे. खाकी वर्दीवर हात उगारल्याने संतापलेल्या पोलिसांनी हर्षवर्धन यांना चोप दिला. यात हर्षवर्धन गंभीर जखमीदेखील झाले होते. 
हर्षवर्धन जाधव यांच्यावर 40  गुन्हे
दरम्यान 2014 मध्ये नागपुरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सुरक्षा बंदोबस्त सांभाळणारे पोलीस निरीक्षक पराग जाधव यांनाही हर्षवर्धन जाधव यांनी कानशिलात लगावली होती. येथील हॉटेल 'प्राइड'मध्ये उद्धव ठाकरे ज्येष्ठ नेत्यांसोबत बैठक घेत होते. यावेळी उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी हॉटेलमध्ये प्रवेश द्यावा, अशी मागणी हर्षवर्धन जाधव करत होते. मात्र ‘यावेळी कोणालाही आता सोडायचे नाही’, असे पोलिसांना सांगण्यात आले.
 
मात्र हॉटेलमध्ये प्रवेश देण्यासाठी जाधव यांनी आरडा-ओरड केला. पण, पराग जाधव यांनी त्यांना आत सोडले नाही. तेव्हा आमदार जाधव यांनी पराग जाधव यांना कानशिलात लगावली आणि तेथून निघून गेले.  या प्रकरणी सोनेगाव पोलिसांनी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणणे आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलगिरी व्यक्त केली होती.