शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

हर्षदीप कांबळे नासुप्रचे नवे सभापती

By admin | Updated: September 2, 2014 01:16 IST

नासुप्रचे सभापती व नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्प साकारण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे ‘मेट्रो मॅन’ प्रवीण दराडे यांच्यावर गणेशोत्सवातच विघ्न ओढवले आहे. त्यांची पुणे येथे मेडाचे

‘मेट्रो मॅन’ दराडे यांची बदली : मेट्रो रेल्वे भूमिपूजनामुळे विघ्ननागपूर : नासुप्रचे सभापती व नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्प साकारण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे ‘मेट्रो मॅन’ प्रवीण दराडे यांच्यावर गणेशोत्सवातच विघ्न ओढवले आहे. त्यांची पुणे येथे मेडाचे (महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी) महासंचालक म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी औरंगाबाद महापालिकेत आयुक्त म्हणून कार्यरत असलेले डॉ. हर्षदीप कांबळे हे नासुप्रचे नवे सभापती म्हणून रुजू होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलेल्या मेट्रो रेल्वेच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी दराडे यांनी पुढाकार घेतला होता. यामुळेच राज्य सरकारने दराडे यांची ‘साईड पोस्टिंग’ केल्याची चर्चा आहे. प्रवीण दराडे यांनी यापूर्वी नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. २ जून २०११ रोजी ते नासुप्रचे सभापती म्हणून रुजू झाले होते. नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांनी बरेच परिश्रम घेतले. मेट्रो रेल्वेचा डीपीआर (विस्तृत प्रकल्प अहवाल) तयार करणे, शासनपातळीवर त्याचे सादरीकरण करणे, सुधारित आराखडा तयार करणे, केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणे आदी जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. मेट्रो रेल्वे प्रकल्पाला गती मिळण्यात दराडे यांचा सिंहाचा वाटा आहे. मात्र, मेट्रो रेल्वेचा भूमिपूजन सोहळा राजकीय स्पर्धेतून गाजला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपुरात या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले, तर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अनुपस्थित राहिले. हा सोहळा यशस्वी झाला. यात दराडे यांची महत्त्वाची भूमिका होती. त्याच वेळी दराडे हे मुख्यमंत्र्यांच्या ‘बॅड लिस्ट’मध्ये गेल्याची चर्चा काँग्रेस वर्तुळात सुरू झाली होती. मोदींचा कार्यक्रम यशस्वी केल्याचे फळ म्हणून दराडे यांची पुण्यात साईड पोस्टवर बदली झाल्याचे आता बोलले जात आहे. नासुप्रचे २०० कोटींवर असलेले बजेट ८०० कोटींवर नेण्यात त्यांना यश आले. दराडे यांनी त्यांच्या कार्यकाळात नागपूर मेट्रो रिजनची यशस्वी अंमलबजावणी केली. शहराबाहेर वसाहतींच्या विकासासाठी गुजरात पॅटर्न (लॅण्ड पुलिंग पॅटर्न) यशस्वीरीत्या राबविला. एनडीझेड (ना विकास क्षेत्र) मधील ले-आऊट नियमित केले. आरक्षणातून ले-आऊट वगळण्याच्या प्रक्रियेला गती दिली. ८० कोटी रुपयांची डांबरीकरणाची कामे करण्यास सुरुवात केली.असे आहेत नवे सभापती नासुप्रचे नवे सभापती म्हणून नियुक्ती झालेले डॉ. हर्षदीप कांबळे हे मुळचे भंडारा जिल्ह्यातील आहेत. त्यांनी एमबीबीएस ची पदवी घेतली आहे. १९९७ च्या बॅचमध्ये ते आयएएस झाले. वयाच्या २७ व्या वर्षी आयएएस होण्याचे कर्तुत्त्व त्यांनी केले. एसडीओ (अकोला), सीईओ, जिल्हाधिकारी (यवतमाळ) या पदांवर त्यांनी काम केले आहे. माजी केंदीय मंत्री मुकुल वासनिक यांचे खासगी सचिव म्हणूनही त्यांनी काम केले आहे. ७ फेब्रुवारी २०१३ रोजी ते औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त म्हणून रुजू झाले होते. तेथून ते आता नागपुरात येत आहेत.