शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हरितऊर्जाच साकारेल ‘मेक इन इंडिया’चे स्वप्न

By admin | Updated: May 31, 2017 04:49 IST

मेक इन इंडियाचे स्वप्न साकार करायचे असेल तर वीज आणि वाहतुकीवरील खर्चात कपात करण्याची आवश्यकता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मेक इन इंडियाचे स्वप्न साकार करायचे असेल तर वीज आणि वाहतुकीवरील खर्चात कपात करण्याची आवश्यकता आहे. हरितऊर्जेला प्राधान्य दिल्यास एकाचवेळी पर्यावरण संवर्धन आणि अर्थव्यवस्थेला गती देणे शक्य असल्याचे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी केले. पर्यावरणपूरक बंदरांची निर्मिती आणि समुद्रातील तेलगळतीसंदर्भात नरिमन पॉइंट येथील शिपिंग कॉर्पोरेशन आॅफ इंडियाच्या सभागृहात विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. ‘ग्रीन पोर्ट्स अ‍ॅण्ड आॅइल स्पिल मॅनेजमेंट २०१७’ या नावाने आयोजित या चर्चासत्राचे उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. गडकरी म्हणाले की, कांडला बंदरात सौर आणि पवनऊर्जेच्या माध्यमातून २०० मेगावॅट वीजनिर्मिती प्रकल्पाची चाचपणी चालू आहे. दीड लाख एकर परिसरात हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. याच पद्धतीने देशभरातील बंदरे, गोदामे आणि मोठ्या सरकारी आस्थापनांवर सौरपॅनलच्या माध्यमातून वीजनिर्मिती करण्याचा मानस असून, त्यासाठी समितीची स्थापना करण्यात आल्याचे गडकरी यांनी सांगितले. या चर्चासत्राच्या माध्यमातून बंदरासाठी हरितऊर्जा निर्मितीचे नवनवे मार्ग समोर येतील; तसेच समुद्रातील तेलगळतीसारख्या दुर्घटनांना सामोरे जाण्यासाठी वैज्ञानिक पद्धती विकसित करण्यास मदत होईल, असे मुंबई पोर्ट ट्रस्टचे संजय भाटिया यांनी प्रास्ताविकात सांगितले. तर, पेट्रोलियम पदार्थांच्या या आयातीमुळे देशाच्या व्यापारात मोठी तूट निर्माण झाली आहे. यावर मात करण्यासाठी हरितऊर्जा निर्मितीवर भर देण्याची गरज असल्याचे इंडियन फेडरेशन आॅफ ग्रीन एनर्जीचे उपाध्यक्ष आणि माजी मंत्री अण्णासाहेब पाटील यांनी सांगितले. देशातील महत्त्वाच्या बंदरांत सध्या १६ मेगावॅटची सौर तर सहा मेगावॅट पवनऊर्जा निर्मितीचे प्रकल्प कार्यान्वित झालेले आहेत. २०२२पर्यंत या माध्यमातून १७५ मेगावॅट वीजनिर्मितीचे सरकारचे उद्दिष्ट आहे. जेएनपीटी बंदराची क्षमता वाढवणारउरण : जेएनपीटी बंदरातील अपुऱ्या सोयी-सुविधांमुळे येथील व्यापारी मोठ्या प्रमाणात गुजरातकडे सरकू लागला आहे, या आरोपामध्ये काही तथ्य नसून जेएनपीटी बंदरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या आणि भविष्यात होणाऱ्या विविध विकासकामांमुळे बंदराची क्षमता वाढणार असल्याचे केंद्रीय जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी उरण येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. जेएनपीटीअंतर्गत उभारण्यात येत असलेल्या चौथ्या बंदराला रेल्वेशी जोडणाऱ्या जासई जेएनपीटी मार्गावरील १५ किमी अंतराच्या तिसऱ्या रेल्वेमार्गाचा शिलान्यास कार्यक्रमप्रसंगी जेएनपीटीचे चेअरमन अनिल डिग्गीकर, माजी खा. रामशेठ ठाकूर, भाजपा रायगड जिल्हाध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर, ट्रस्टी महेश बालदी, उरण नगराध्यक्षा सायली म्हात्रे आदि मान्यवर उपस्थित होते