शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

हार्बरवासी प्रवाशांना खूशखबर

By admin | Updated: May 30, 2016 02:02 IST

हार्बर मार्गावर १२ डबा लोकल चालविण्यासाठी नऊ डब्याच्या लोकल १२ डबा करण्याचे काम वेगाने सुरू आहे.

मुंबई : हार्बर मार्गावर १२ डबा लोकल चालविण्यासाठी नऊ डब्याच्या लोकल १२ डबा करण्याचे काम वेगाने सुरू आहे. येत्या तीन दिवसांत हार्बरवरील २00 लोकल फेऱ्या १२ डब्यांच्या केल्या जातील, अशी माहिती मध्य रेल्वे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद यांनी मुंबईतील रेल्वेच्या एका कार्यक्रमात दिली. यामुळे हार्बरवासीयांचा प्रवास सुकर होण्यास मदत मिळेल. पश्चिम रेल्वेबरोबरच मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर १२ डबा, त्याचबरोबर १५ डबा लोकलही धावत आहेत. मात्र हार्बरवासीय १२ डबा लोकलपासून उपेक्षितच होते. त्यामुळे १२ डबा लोकल चालविण्यासाठी एमआरव्हीसीकडून (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) मध्य रेल्वेच्या हार्बरवरील प्लॅटफॉर्मच्या लांबीकरणाचे काम दोन वर्षांपूर्वी हाती घेण्यात आले. हे काम पूर्ण करताना सीएसटी आणि डॉकयार्डमधील प्लॅटफॉर्मच्या लांबीकरणात मोठे अडथळे येत होते. मात्र ही कामेही नुकतीच पूर्ण करून हार्बरचा मार्ग मोकळा करण्यात आला आणि हार्बरवर १२ डब्यांची पहिली लोकल एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात धावली. हार्बर मार्गावर सीएसटी ते कुर्ला अशी चार डब्यांची लोकल १९२५ साली धावली होती आणि त्यानंतर हार्बर रेल्वेनेही कात टाकण्यास सुरुवात केली. आता हार्बरवर आणखी लोकल फेऱ्या १२ डबा करण्याचे काम वेगाने केले जात आहे. हार्बर मार्गावर ३६ लोकलच्या ५९0 फेऱ्या होतात. सध्या हार्बर मार्गावर १२ डब्याच्या आठ लोकल धावत असून, येत्या काही दिवसांत २00 फेऱ्या आठ डब्यांच्या केल्या जातील, अशी माहिती मध्य रेल्वे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद यांनी दिली. त्यानंतर पुढील आठवड्यापर्यंत १२ डब्यांच्या आणखी २00 फेऱ्या १२ डब्या केल्या जातील आणि जूनअखेरपर्यंत उर्वरित फेऱ्या १२ डबा होतील, असे सूद म्हणाले.