शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

गणेशभक्तांना खूशखबर

By admin | Updated: June 18, 2016 01:30 IST

मुंबई, ठाणेहून कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी मध्य रेल्वेकडून १४२ गणपती विशेष ट्रेन (फेऱ्या) सोडण्यात येणार आहेत. सीएसटी-करमाळी

मुंबई : मुंबई, ठाणेहून कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी मध्य रेल्वेकडून १४२ गणपती विशेष ट्रेन (फेऱ्या) सोडण्यात येणार आहेत. सीएसटी-करमाळी-सीएसटीदरम्यान ४0, सीएसटी-करमाळी-सीएसटीसाठी सहा, दादर-सावंतवाडी-दादरसाठी २२, पनवेल-चिपळूण-पनवेल डेमूच्या ३६, ट्रेन नंबर दादर-रत्नागिरी-दादरसाठी १०, ट्रेन नंबर एलटीटी-सावंतवाडी-एलटीटीदरम्यान २८ ट्रेनचा त्यात समावेश आहे. या सर्व फेऱ्यांच्या तिकीट आरक्षणाची तारीख लवकरच कळविण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)एलटीटी-सावंतवाडी-एलटीटी (२८ फेऱ्या-आठवड्यातून तीन दिवस)ट्रेन नंबर 0१0३७ एलटीटीहून २५ आॅगस्ट ते २४ सप्टेंबरपर्यंत सोमवारी, गुरुवारी आणि शनिवारी ५.३0 वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे त्याच दिवशी १६.00 वाजता पोहोचेल. ट्रेन नंबर 0१0३८ सावंतवाडी येथून २६ आॅगस्ट ते २५ सप्टेंबरपर्यंत मंगळवारी, शुक्रवारी आणि रविवारी ६.४0 वाजता सुटेल आणि एलटीटी येथे त्याच दिवशी १८.३0 वाजता पोहोचेल.सीएसटी-करमाळी-सीएसटी (४0 फेऱ्या - गुरुवार सोडता अन्य सहा दिवस धावेल)ट्रेन नंबर 0१0२१ सीएसटीहून २७ आॅगस्ट ते १८ सप्टेंबरपर्यंत 00.२0 वाजता सुटेल आणि करमाळी येथे त्याच दिवशी १४.३0 वाजता पोहोचेल. ट्रेन नंबर 0१0२२ करमाळी येथून १५.२५ वाजता सुटून सीएसटी येथे दुसऱ्या दिवशी ४.२५ वाजता पोहोचेल. या ट्रेनला दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, सावंतवाडी रोड, मदुरे, पेरणेम, थिवीम येथे थांबा असेल.सीएसटी-करमाळी-सीएसटी (६ फेऱ्या-फक्त गुरुवारी धावेल)ट्रेन नंबर 0१00३ सीएसटीहून १ सप्टेंबर ते १५ सप्टेंबरपर्यंत 00.४0 वाजता सुटेल आणि करमाळी येथे त्याच दिवशी १४.३0 वाजता पोहोचेल. ट्रेन नंबर 0१00४ करमाळी येथून १५.२५ वाजता सुटेल आणि सीएसटी येथे दुसऱ्या दिवशी ४.२५ वाजता पोहोचेल. या ट्रेनला दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी,अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, सावंतवाडी रोड, मदुरे, थिविम या स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. दादर-सावंतवाडी-दादर (२२ फेऱ्या-आठवड्यातून तीन दिवस धावेल)ट्रेन नंबर 0१0९५ दादर स्थानकातून २६ आॅगस्ट ते १८ सप्टेंबरपर्यंत रविवार, बुधवार आणि शुक्रवारी ७.५0 वाजता सुटेल आणि सावंतवाडी येथे १९.00 वाजता पोहोचेल. ट्रेन नंबर 0१0९६ सावंतवाडी येथून २७ आॅगस्ट ते १९ सप्टेंबरपर्यंत सोमवारी, गुरुवारी आणि शनिवारी ४.५0 वाजता सुटून दादर येथे १६.00 वाजत पोहोचेल. या ट्रेनला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप येथे थांबा देण्यात आला आहे. दादर-रत्नागिरी-दादर (१0 फेऱ्या-आठवड्यातून एक दिवस)ट्रेन नंबर 0१0८९ दादर येथून २६ आॅगस्ट ते २३ सप्टेंबरपर्यंत प्रत्येक शुक्रवारी २१.४५ वाजता सुटून रत्नागिरी येथे दुसऱ्या दिवशी ६.00 वाजता पोहोचेल. ट्रेन नंबर 0१0९0 रत्नागिरी येथून २७ आॅगस्ट ते २४ सप्टेंबरपर्यंत प्रत्येक शनिवारी ९.२0 वाजता सुटेल आणि दादर येथे त्याच दिवशी १६.४0 वाजता पोहोचेल. या ट्रेनला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, अरवली रोड, संगमेश्वर रोड येथे थांबा असेल.पनवेल-चिपळूण-पनवेल डेमू (३६ फेऱ्या)ट्रेन नंबर 0११0७ पनवेल येथून आॅगस्टच्या २९ ते ३१ आॅगस्टपर्यंत तसेच सप्टेंबर महिन्याच्या २,३,४,६,७,८,१0,११,१२,१४,१५,१६,१८,१९,२0 तारखेला ११.१0 वा. सुटेल आणि चिपळूण येथे १६.00 वा.त्याच दिवशी पोहोचेल. 0११0८ चिपळूण येथून त्याच तारखांना १७.३0 वा.सुटून पनवेलला २२.३0वा. पोहोचेल. या ट्रेनला पेण, रोहा, कोलाड, इंदापूर रोड, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे, वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, खेड, अंजनी स्थानकात थांबा असेल.