शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

हनुमान मंदिरप्रवेशाचा महिलांचा प्रयत्न

By admin | Updated: January 4, 2016 03:21 IST

शनिदेवाच्या चौथऱ्यावर महिलेने प्रवेश केल्याची घटना ताजी असतानाच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त रूढी- परंपरा झुगारून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस महिला

बीड : शनिदेवाच्या चौथऱ्यावर महिलेने प्रवेश केल्याची घटना ताजी असतानाच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त रूढी- परंपरा झुगारून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी हनुमान मंदिरात प्रवेशाचा प्रयत्न केला. दोन तास ठिय्या देऊनही पुजाऱ्याने मंदिराचा दरवाजा न उघडल्याने महिलांना माघार घ्यावी लागली. शहरातील सामाजिक न्यायभवनाच्या पाठीमागे श्री संकल्पसिद्धी हनुमान मंदिर आहे. मंदिराच्या बाहेर ‘महिलांनी आत प्रवेश करू नये,’ अशी सूचना लिहिलेली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अ‍ॅड. हेमा पिंपळे व इतर तीन महिलांनी आक्षेप घेतला. रविवारी सकाळी महिलांनी पुजाऱ्यास फोन करून अभिषेक करावयाचा असल्याचे सांगितले. साड ेनऊच्या सुमारास पुजारी त्या ठिकाणी आला; मात्र त्या वेळी काही महिला व एक पुरुष असल्याचे त्याला दिसले. पुजाऱ्याला श्री संकल्पसिद्धी हनुमान मंदिर मित्रमंडळाच्या तरुणांनी मंदिर न उघडण्याचा सल्ला दिला. या वेळी संतप्त महिलांनी घोषणाबाजी सुरू केली. दरम्यान, शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या वेळी पिंपळे यांनी मंदिराचे पुजारी व इतरांना मंदिराबाहेरील महिलांसाठी लिहिलेली सूचना मिटवून टाकण्याची मागणी केली. मंदिरासमोर गर्दी जमा झाल्यानंतर पुजारी अचानक दिसेनासे झाले. सूचना मिटविण्याचे आश्वासन मंदिर मित्रमंडळाच्या सदस्यांनी दिल्यानंतर तब्बल दोन तासांनी महिला निघून गेल्या. सायंकाळपर्यंत मंदिराच्या बाहेरील ‘महिलांनी आत प्रवेश करू नये’ हे वाक्य मिटविण्यात आले. (प्रतिनिधी)महिलांवर निर्बंध लादू नयेतस्त्री-पुरुष समान असे म्हटले जाते; मग महिलांना मंदिरात प्रवेश का दिला जात नाही, आपण आधुनिक महाराष्ट्रात राहात आहोत. जुनी विचारधारा बदलणे आवश्यक आहे. ज्या महिला मंदिरात जाऊन दर्शन घेऊ इच्छितात, त्यांना घेऊ द्यावे. हा विषय त्यांच्यासाठी ऐच्छिक असावा. त्यांच्यावर निर्बंध लादू नयेत, असे अ‍ॅड. हेमा पिंपळे यांनी सांगितले.