शहरं
Join us  
Trending Stories
1
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
2
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
3
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
4
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
5
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
6
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
7
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
8
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
9
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
10
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
11
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
12
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS
13
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
14
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
15
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
16
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
17
'लग्न टिकवायचं असेल तर स्त्रीने नेहमीच..." शर्मिला टागोर यांनी लेक सोहाला दिला होता 'हा' सल्ला
18
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
19
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
20
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!

दहा संचालकांवर टांगती तलवार

By admin | Updated: January 6, 2016 00:58 IST

न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष : मुश्रीफ, सरनाईकांसमोरील अडचणी कायम

कोल्हापूर : गैरव्यवहारामुळे बरखास्त संचालक मंडळांना दहा वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. या निर्णयामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दहा विद्यमान संचालकांवर कारवाईची टांगती तलवार राहणार आहे. विभागीय सहनिबंधकांनी दिलेल्या वसुलीच्या नोटिसीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून त्याची सुनावणी १४ जानेवारी आहे. आमदार हसन मुश्रीफ व बाळासाहेब सरनाईक हे राज्य बँकेच्या बरखास्त संचालक मंडळात होते. त्यामुळे जिल्हा बँकेबाबत न्यायालयाने काहीही निर्णय दिला तरीही मुश्रीफ व सरनाईक यांच्यासमोरील अडचणी कायम राहणार आहेत. विनातारण, अपुऱ्या तारणावर कर्ज वाटप केल्याप्रकरणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ४५ माजी संचालकांवर १४७ कोटींची जबाबदारी निश्चित केली आहे. प्राधीकृत अधिकारी सचिन रावल यांनी जबाबदारी निश्चितीच्या कारवाईनुसार विभागीय सहनिबंधक राजेंद्र दराडे यांनी वसुलीच्या नोटिसा संबंधितांना लागू केल्या होत्या. याविरोधात संचालकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याला न्यायालयाने स्थगिती दिली असून यावर १४ जानेवारीला सुनावणी होणार आहे. दरम्यान, राज्य सहकारी बँक व काही जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कारभाऱ्यांनी गैरव्यवहार केल्याने संचालक मंडळ बरखास्त करून तिथे प्रशासक नियुक्त केला आहे तेथील संचालकांनी दहा वर्षे सहकारी संस्थेमधील निवडणूक लढविता येणार नाही, असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला. यापूर्वी बरखास्त संचालकांना सहा वर्षे निवडणूक लढवता येत नव्हती. त्यामध्ये आणखी चार वर्षांची वाढ करून भाजप सरकारने दोन्ही काँग्रेसच्या कारभाऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. या निर्णयामुळे जिल्हा बँकेचे दहा विद्यमान संचालक अडचणीत येऊ शकतात. त्याचबरोबर ३५ माजी संचालकांना दहा वर्षे निवडणूक लढवता येणार नाही. आमदार हसन मुश्रीफ व बाळासाहेब सरनाईक हे राज्य सहकारी बँकेचे बरखास्त संचालक मंडळात होते. जिल्हा बँकेच्या कारवाईबाबत न्यायालयीन लढाई सुरू आहे. त्याचा निकालावर उर्वरित संचालकांचे भवितव्य असले तरी मुश्रीफ अडचणीत येऊ शकतात. आमदार हसन मुश्रीफ के. पी. पाटील ए. वाय. पाटील विनय कोरे निवेदिता माने पी. एन. पाटीलमहादेवराव महाडिक पी. जी. शिंदे राजू आवळे नरसिंग गुरुनाथ पाटीलसहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी हिटलरशाहप्रमाणे पूर्वलक्षी प्रभावाने हा निर्णय घेतला आहे. एकेकाळी हिटलरने सामान्य माणसांना गॅस चेंबरमध्ये घालून मारले होते. त्याप्रमाणे मंत्रिमहोदयांचे काम सुरू असून दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांवर ते आकसापोटी कारवाई करण्याचे प्रयत्न करत आहेत. मंत्रिमंडळाने मान्यता दिली असली तरी राज्यपालांनी अजून स्वाक्षरी केलेली नाही. कायद्याचा अभ्यास करून आम्ही न्यायालयात दाद मागू. - आमदार हसन मुश्रीफ अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बॅँक