शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील रक्तपेढ्यांमध्ये ठणठणाट ; दोन-तीन दिवस पुरेल एवढाचा साठा

By admin | Updated: May 15, 2016 19:08 IST

दरवर्षी उन्हाळ्यात रक्ताची टंचाई जाणवते. एकीकडे याच दिवसांत रक्ताची मागणी वाढलेली असताना दुसरीकडे रक्तदात्यांची संख्या कमी झालेली असते.

नागपूर : दरवर्षी उन्हाळ्यात रक्ताची टंचाई जाणवते. एकीकडे याच दिवसांत रक्ताची मागणी वाढलेली असताना दुसरीकडे रक्तदात्यांची संख्या कमी झालेली असते. मागणी जास्त आणि पुरवठा कमी झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांवर रक्तासाठी धावपळ करण्याची वेळ येते. याही वर्षी हीच स्थिती आहे. शासकीयसह खासगी रक्तपेढ्यांमध्ये दोन-तीन दिवस पुरेल एवढाच रक्त पिशव्यांचा साठा आहे. रक्तपेढ्यांमध्ये रक्ताच्या ठणठणाटामुळे सर्वच रक्तपेढ्यांनी रक्तदानाचे आवाहन केले आहे.उपराजधानित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो), डागा रुग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यासह रुग्णांना अत्याधुनिक आणि दर्जेदार सुविधा देणारी अडीचशेवर खासगी रूग्णालये आहेत. यामुळे विदर्भच नाहीतर छत्तीसगड, मध्यप्रदेशातून, तेलंगाणा येथून रूग्णांचा ओढा नागपुरकडे वाढला आहे. यात प्रामुख्याने गंभीर आजार, अपघात आणि बाळांतपणाच्या रूग्णांची संख्या अधिक असते. यांना रक्तपुरवठा करणाऱ्या चार शासकीयसह नऊ खासगी रक्तपेढ्या आहेत. परंतु सर्वच ठिकाणी जेम-तेम रक्ताचा साठा उपलब्ध आहे. विशेषत: ह्यनिगेटीव्हह्ण ग्रुपच्या रक्ताची चणचण आहे. काही रक्तपेढ्या ह्यनिगेटीव्हह्ण ग्रुपचा रक्तदाता उपलब्ध करून देण्याच्या अटीवरच या ग्रुपचे रक्त देत आहे. इतर ग्रुपमध्ये ह्यएबीह्ण, ह्यओह्ण व ह्यबीह्ण पॉझिटीव्ह रक्ताचा साठाही जेमतेम असल्याची माहिती आहे.- रोज एक हजार रक्तपिशव्यांची मागणीशहरात दिवसाकाठी साधारण एक हजार रक्तपिशव्यांची मागणी असते. परंतु सध्याच्या दिवसात २००-३०० रक्तपिशव्यांचा पुरवठा होत आहे. रक्त दिलेल्या सर्वच रूग्ण रिप्लेसमेंट रक्त देतील असे नाही. उन्हाळी सुट्या असल्याने अनेक रक्तदाते देखील बाहेरगावी जातात. या दिवसांत रक्तदान शिबिरे कमी झालेली असतात. उन्हाळ््यात रक्तदान केल्याने शरीराला नुकसान होईल किंवा बाहेर पडल्यावर लगेच चक्कर येईल अशा प्रकारचे गैरसमज असल्याने रक्तदान करण्यास कचरतात. याचा फटका बसतो तो रक्तपेढ्यांना व रुग्णांना.