शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
3
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
4
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
5
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
6
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
7
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
8
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
9
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
10
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
11
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
12
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
13
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
14
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
15
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
16
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
17
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
18
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
19
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

युग चांडक हत्याकांड प्रकरणातील आरोपींची फाशी कायम

By admin | Updated: May 5, 2016 17:05 IST

संपूर्ण राज्यात खळबळ उडविणाऱ्या युग चांडक अपहरण व खून खटल्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आरोपींची फाशीची शिक्षा कामय ठेवली आहे

 
ऑनलाइन लोकमत
नागपूर. दि. ५ : संपूर्ण राज्यात खळबळ उडविणाऱ्या युग चांडक अपहरण व खून खटल्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आरोपींची फाशीची शिक्षा कामय ठेवली आहे. याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने दोन्ही आरोपींना दुहेरी फाशीची शिक्षा ठोठावली होती. त्यावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे आहे.
 1 सप्टेंबर 2014 रोजी राजेश धनालाल दवारे (वय 19) आणि अरविंद अभिलाष सिंग (वय 23) या दोन आरोपींनी युग चांडक या शाळकरी मुलाचे अपहरण करुन खून केला होता. दोन्ही आरोपींविरुद्ध लावण्यात आलेले आरोप जिल्हा न्यायालयात सिद्ध झाले. याअंतर्गत दोघांनाही दुहेरी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.

युगला नाल्यात पुरून डोक्यावर ठेवला होता दगड - 

निष्पाप आणि असहाय्य बालक युग चांडक याचे अपहरण केल्यानंतर दोन्ही नराधमांनी त्याला सावनेर मार्गावरील लोणखैरी येथे नेऊन निर्घृण खून केला होता आणि तेथील नाल्यात मृतदेह गाडून युगच्या डोक्यावर मोठा दगड ठेवला होता. दोसरभवन चौकातील प्रसिद्ध दंतचिकित्सक डॉ. मुकेश चांडक यांचा वर्धमाननगरच्या सेंटर पॉर्इंट शाळेत तिसऱ्या वर्गात शिकणारा मुलगा युग याचे राजेश दवारे आणि अरविंद सिंग यांनी १ सप्टेंबर २०१४ रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास लकडगंज छापरूनगर भागातील गुरुवंदना सोसायटीसमोरून अपहरण केले होते. आरोपींकडून दोनवेळा खंडणीसाठी फोन करण्यात आले होते. पहिला फोन १ सप्टेंबर २०१४ रोजी रात्री ८.१७ वाजता खुद्द डॉ. मुकेश चांडक यांना करण्यात आला होता.

                              

फोन करणाऱ्याने स्वत:चे नाव ह्यमोहसीन खानह्ण असल्याचे सांगितले होते. त्याने १० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. लागलीच रात्री ८.३८ वाजता दुसरा फोन आला होता. ह्ययुग हमारे कब्जे मे है, पाच करोड लेकर आओ, कल शाम ३ बजे बम्बई मे पैसे लेकर आनाह्ण, असे अपहरणकर्ता म्हणाला होता. अपहरणकर्त्यांनी दहेगाव-पाटणसावंगी दरम्यानच्या लोणखैरी येथील नाल्यात युगचा गळा दाबून निर्घृण खून केला होता. २ सप्टेंबर रोजी आरोपींच्या कबुलीवरून युगचा मृतदेह गवसला होता. मृतदेह नाल्यात रेती व पालापाचोळ्याने झाकलेला होता आणि डोक्यावर मोठा दगड ठेवलेला होता. तत्पूर्वी युगच्या अंगावरील शाळेचा निळ्या रंगाचा टी शर्ट आरोपीने काढून घेतला होता.

हा शर्ट डॉ. चांडक यांना दाखवून खंडणी वसूल करण्याचा त्यांचा इरादा होता. परंतु राजेश पोलिसांच्या हाती लागल्याचे समजताच अरविंदने हा शर्ट लोणखैरीच्याच एका नाल्यात फेकला होता. पोलिसांनी युगचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर तो मेयो इस्पितळाकडे रवाना केला होता. युगचे शवविच्छेदन ३ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास मेयो इस्पितळात डॉ. अविनाश वाघमोडे, डॉ. एच. के. खरतडे आणि डॉ. एम. एस. गेडाम यांच्या पॅनलने केले होते. युगचा मृत्यू गुदमरून झाल्याचा त्यांनी अभिप्राय दिला होता. मृतदेहावर २६ जखमा होत्या. त्यापैकी २२ जखमा मृत्यूपूर्वीच्या आणि ४ मृत्यूनंतरच्या होत्या. मृत युगचे वडील डॉ. मुकेश चांडक यांच्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी भादंविच्या ३०२, ३६४-अ, १२० -ब, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.