शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

जानकरांचा हातात हात तर पवारांची गळाभेट

By admin | Updated: January 13, 2016 01:35 IST

बदलती समीकरणे : पालकमंत्र्यांच्या माध्यमातून शिवसेनेकडे रासपचे एक पाऊल; भाजपच्या हालचालींना माजी पालकमंत्र्यांकडून सबुरीचा सल्ला

सातारा : जिल्ह्याच्या बदलत्या राजकारणाची समीकरणे आता वेगाने घडू पाहत आहेत. भाजपच्या बेदिलीमुळे घायाळ झालेले आमदार महादेव जानकर शिवसेनेशी जवळीक करण्याच्या विचारात आहेत. तर भाजपचे दीपक पवार कुठलेही प्रकरण राष्ट्रवादीने शेकवण्यासाठी भाजप-सेनेची मोट बांधू पाहत आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत याचे चित्र स्पष्टपणे दिसले. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आमदार महादेव जानकर काही दिवसांपासून अस्वस्थ आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीलाही ते याआधी उपस्थित राहिलेले नव्हते. सोमवारच्या बैठकीत त्यांनी हजेरी लावली; पण संपूर्ण सभेच्या कामकाजाच्यावेळेत त्यांनी मुद्दा मांडला नाही. जानकरांच्या या मौनात बरीच अस्वस्थता सामावली होती, हे सांगायचीही गरज नव्हती. बैठक संपल्यानंतर मात्र आ. जानकरांनी पालकमंत्री विजय शिवतारे यांची भेट घेऊन त्यांच्या हातात हात देत पुढील राजकारणाची दिशा स्पष्ट केली. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीच्या नेत्यांवर तुटून पडण्याची संधी शोधणाऱ्या भाजपचे जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांनी आ. जयकुमार गोरे यांनी मांडलेल्या बंधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर माजी पालकमंत्री व जलसंपदामंत्री आ. शशिकांत शिंदे यांना लक्ष करण्याचा प्रयत्न केला होता. सध्याच्या पालकमंत्र्यांवर हे प्रकरण बेतता कामा नये, असे सावध पण सूचक वक्तव्यही त्यांनी केले. सभा संपल्यानंतर आ. शिंदे यांनी दीपक पवारांना जवळ घेत त्यांच्याशी चर्चा केली. चर्चेच्या अंती या दोघांनी एकमेकांच्या गळ्यात गळेही घातले. (प्रतिनिधी)माण-खटावकडे द्या लक्ष....माण तालुक्यामध्ये राष्ट्रवादी ताकद क्षीण झाली आहे. या परिस्थितीत काँगे्रस आणि रासप या दोन पक्षांची ताकद वाढताना पाहायला मिळत आहे. रासपचे आमदार महादेव जानकर यांनी आता भाजपशी पंगा घेतला असल्याने त्यांना सोबत घेण्यासाठी पालकमंत्री शिवतारे प्रयत्न करण्याच्या तयारीत आहेत.कोरेगावात असलो तरी जावळीवर नजरमाजी पालकमंत्री आमदार शशिकांत शिंदे यांना जावळी मतदारसंघातून कोरेगावकडे पुनर्वसित व्हावे लागले होते. तरीही जावळी तालुक्यावर त्यांनी आपली पकड कायम ठेवली आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत केलेला पराभव विसरला काय?, असंच जणू शिंदे यांनी दीपक पवारांना सांगितले.