शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मदतीअभावी अपंगाचा होरपळून मृत्यू

By admin | Updated: May 10, 2016 17:03 IST

रस्ता क्रॉस करून देण्यासाठीही अपंगाला मदत करण्याची आपली संस्कृती, मात्र चिंचवडमध्ये एक अपंग आगीमध्ये होरपळत असतानाही कोणी त्याच्या मदतीला धावून गेले नाही.

ऑनलाइन लोकमत 

पिंपरी, दि. १० - रस्ता क्रॉस करून देण्यासाठीही अपंगाला मदत करण्याची आपली संस्कृती, मात्र चिंचवडमध्ये एक अपंग आगीमध्ये होरपळत असतानाही कोणी त्याच्या मदतीला धावून गेले नाही. त्यामुळे चिंचवड स्टेशन येथे रोहित्रच्या स्फोटात गटई कामगार पोपट बनसोडे यांचा मृत्यू झाला. 
 
आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेले बनसोडे गेल्या काही वर्षापासून रोहित्रखाली बसून गटई काम करीत होते. ते कुटुंबातील कर्ता पुरुष होते. त्यांचा दुर्दैवी अंत झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, विद्युत महावितरणने त्यांच्या कुटुंबीयांना भरपाईच्या स्वरूपात आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी विविध संघटनांकडून होत आहे.  
 
पुणे- मुंबई महामार्गावरील अत्यंत वर्दळीचे ठिकाण असलेल्या ठिकाणी चिंचवड येथे विद्युत रोहित्रचा स्फोट होऊन गटई कामगार बनसोडे यांचा मृत्यू झाला. रोहित्रतील तेल अंगावर पडून धोका निर्माण झाला असताना, पायाने अधू असल्याने त्यांना जीव वाचविण्यासाठी पळता आले नाही. एम्पायर इस्टेट उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने या मार्गावरील वाहतूक उजवीकडून वळविण्यात आली असल्याने पिंपरीहून चिंचवडकडे येणा-या मार्गात त्या ठिकाणी अडथळा निर्माण झाला होता. 
 
त्यामुळे ही घटना घडली, त्या वेळी बनसोडे यांना तातडीची मदत मिळाली नाही. विद्युत रोहित्रची आग विझविणा-या अग्निशामक दलाचा बंब त्या ठिकाणी आणण्यासाठी अडचणी आल्या. चिंचवड चौकातून वळसा घेऊन बंब पाहोचेर्पयत रोहित्रने पेट घेतला होता. आगीच्या ठिणग्या पडून बनसोडे बसलेल्या परिसरातील हातगाडी, रिक्षा आणि एका मोटारीने पेट घेतला होता. पेटलेल्या वाहनांच्या आगीत घेरलेल्या बनसोडे यांना पाय अधू असल्याने स्वत:हून बाहेर पडणोही कठीण झाले होते. 
 
शारीरिक अपंगत्व, त्यात मदतीला कोणी नाही, यामुळे बनसोडे यांचा या घटनेत मृत्यू झाला. चिंचवड स्टेशन येथील इंदिरानगर झोपडपट्टीत छोटय़ा खोलीत कुटुंबासह राहणारे बनसोडे कुटुंबीय गेल्या दोन दिवसांपासून हवालदिल झाले आहे. वर्दळीच्या ठिकाणी  असलेल्या विद्युत रोहित्रची सुरक्षिततेच्या दृष्टीने दक्षता न घेतल्याने ही दुर्घटना घडली आहे. त्यात गरीब कुटुंबातील बनसोडे यांचा बळी गेला. 
 
बनसोडे कुटुंबीयांना विद्युत महावितरणकडून भरपाई मिळणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विद्युत महावितरणच्या अधिका:यांनी मात्र या घटनेला विद्युत महावितरण जबाबदार नसल्याचे म्हटले आहे. विद्युत रोहित्रच्या ठिकाणी होणा:या अतिक्रमणांवर नियंत्रण आणण्याची जबाबदारी महापालिकेची आहे, असे त्यांचे म्हणणो असून, बनसोडे कुटुंबीयांना कोणाकडून मदत मिळणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.