शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

मदतीअभावी अपंगाचा होरपळून मृत्यू

By admin | Updated: May 11, 2016 01:08 IST

अगदी रस्ता क्रॉस करून देण्यासाठीही अपंगाला मदत करण्याची आपली संस्कृती; मात्र चिंचवडमध्ये एक अपंग आगीमध्ये होरपळत असतानाही कोणी त्याच्या मदतीला धावून गेले नाही

पिंपरी : अगदी रस्ता क्रॉस करून देण्यासाठीही अपंगाला मदत करण्याची आपली संस्कृती; मात्र चिंचवडमध्ये एक अपंग आगीमध्ये होरपळत असतानाही कोणी त्याच्या मदतीला धावून गेले नाही. त्यामुळे चिंचवड स्टेशन येथे रोहित्राच्या स्फोटात गटई कामगार पोपट बनसोडे यांचा मृत्यू झाला. आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेले बनसोडे गेल्या काही वर्षांपासून रोहित्राखाली बसून गटई काम करीत होते. ते कुटुंबातील कर्ता पुरुष होते. त्यांचा दुर्दैवी अंत झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, विद्युत महावितरणने त्यांच्या कुटुंबीयांना भरपाईच्या स्वरूपात आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी विविध संघटनांकडून होत आहे. पुणे- मुंबई महामार्गावरील अत्यंत वर्दळीचे ठिकाण असलेल्या ठिकाणी चिंचवड येथे विद्युत रोहित्राचा स्फोट होऊन गटई कामगार बनसोडे यांचा मृत्यू झाला. रोहित्रातील तेल अंगावर पडून धोका निर्माण झाला असताना, पायाने अधू असल्याने त्यांना जीव वाचविण्यासाठी पळता आले नाही. एम्पायर इस्टेट उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने या मार्गावरील वाहतूक उजवीकडून वळविण्यात आली असल्याने पिंपरीहून चिंचवडकडे येणाऱ्या मार्गात त्या ठिकाणी अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे ही घटना घडली, त्या वेळी बनसोडे यांना तातडीची मदत मिळाली नाही. विद्युत रोहित्राची आग विझविणाऱ्या अग्निशामक दलाचा बंब त्या ठिकाणी आणण्यासाठी अडचणी आल्या. चिंचवड चौकातून वळसा घेऊन बंब पोहोचेपर्यंत रोहित्राने पेट घेतला होता. आगीच्या ठिणग्या पडून बनसोडे बसलेल्या परिसरातील हातगाडी, रिक्षा आणि एका मोटारीने पेट घेतला होता. पेटलेल्या वाहनांच्या आगीत घेरलेल्या बनसोडे यांना पाय अधू असल्याने स्वत:हून बाहेर पडणेही कठीण झाले होते. शारीरिक अपंगत्व, त्यात मदतीला कोणी नाही, यामुळे बनसोडे यांचा या घटनेत मृत्यू झाला.