शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

तळेगाव नगर परिषदेवर ‘जनसेवा’चा हंडा मोर्चा

By admin | Updated: March 4, 2017 01:22 IST

अनियमित पाणीपुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ तळेगाव जनसेवा विकास समितीच्या वतीने शुक्रवारी नगर परिषदेवर हंडा मोर्चा काढण्यात आला.

तळेगाव दाभाडे : तळेगाव स्टेशन भागातील नागरिकांना कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ तळेगाव जनसेवा विकास समितीच्या वतीने शुक्रवारी नगर परिषदेवर हंडा मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व माजी नगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका सुलोचना आवारे, विरोधी पक्षनेत्या हेमलता खळदे व ज्येष्ठ नगरसेवक गणेश खांडगे यांनी केले. सत्ताधारी मित्र पक्षानेच मोर्चा काढून खुर्च्या खाली करण्याचा घरचा आहेर दिल्याने शहरात याची चर्चा सुरूआहे.मोर्चात सामाजिक कार्यकर्ते किशोर आवारे, नगरसेवक संग्राम काकडे, रोहित लांघे, सचिन टकले, नगरसेविका अनिता पवार, सुमित्रा दौंडकर, सलोनी तारकर, कल्पना साळुंके, चैताली देशमुख, सुरेखा वाडेकर, मंगल चिखले यांच्यासह महिला व नागरिक सहभागी झाले होते. या वेळी मोर्चेकऱ्यांनी नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांच्या केबीनमध्ये रिकामे माठ फोडून निषेध व्यक्त केला. मुख्याधिकारी वैभव आवारे यांना या वेळी निवेदन देण्यात आले. याप्रसंगी आवारे म्हणाल्या, नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांना प्रशासनाकडून काम करून घेता येत नसेल, तर त्यांनी खुर्च्या खाली कराव्यात. आम्ही प्रशासनाकडून पाणीप्रश्न मार्गी लावू. लोकप्रतिनीधी म्हणून स्टेशन भागातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.नगरसेवक खांडगे म्हणाले की, स्टेशन भागातील पाण्याच्या जटील समस्येमुळे महिलांच्या डोळ्यांत पाणी येण्याची वेळ आली आहे. पाणी वाटपात गाव आणि स्टेशन भाग असा जाणूनबुजून दुजाभाव केला जात आहे. आठ मार्चपर्यंत पाणीप्रश्नमार्गी लागला नाही, तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल. विरोधी पक्षनेत्या खळदे यांनी प्रशासनावर सडकून टीका केली. राजीव फलके, सुमित्रा दौंडकर यांनी पाण्यामुळे हाल होत असल्याबाबत तीव्र्र संताप व्यक्त केला. नगराध्यक्षा जगनाडे म्हणाल्या, इंद्रायणी पाणीपुरवठा केंद्राच्या सक्षमीकरणाचे काम सुरू असून, ते पूर्ण होताच स्टेशन भागातील पाणी प्रश्न सुटण्यास मोठी मदत होईल.मुख्याधिकारी आवारे यांनी मोर्चेकरांना आश्वासन देताना सांगितले की, ८ मार्चपर्यंत स्टेशन भागातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जातील. तोपर्यंत नागरिकांनी सहकार्य करावे. (वार्ताहर)समस्येचे निराकरण करास्टेशन भागास अपुऱ्या दाबाने व अनियमित पाणीपुरवठा होत असून, त्यामुळे महिलांना जाच सहन करावा लागतो. पाण्याच्या गैरसोईमुळे प्रचंड हाल होत आहेत. इंद्रायणी जॅकवेलमधून होणारा पाणीपुरवठा सुरू होण्यास बराच अवधी लागू शकतो.त्यामुळे पाणीप्रश्नाच्या या गंभीर समस्येचे युद्धपातळीवर निराकरण करावे. शहरातील प्रत्येक भागाला वेगवेगळ्या वेळात पाणी सोडावे, पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करावा आणि पाण्याचे वेळापत्रकतयार करावे, अशा मागण्या या वेळी देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.