शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मलंग रस्त्यावरील १२३ बांधकामांवर हातोडा

By admin | Updated: March 1, 2017 03:54 IST

केडीएमसीने मंगळवारी पूर्वेतील मलंग रस्त्यावर रस्ता रुंदीकरणाची मोहीम हाती घेतली

कल्याण : केडीएमसीने मंगळवारी पूर्वेतील मलंग रस्त्यावर रस्ता रुंदीकरणाची मोहीम हाती घेतली. चक्कीनाका ते नेवाळी नाका दरम्यान केलेल्या कारवाईत १२३ बांधकामे तोडली. या कारवाईत दुजाभाव केला जात असल्याचा आरोप करीत स्थानिकांनी कारवाईला विरोध केला. त्यामुळे कारवाई अर्धवट सोडत महापालिकेची पथके माघारी परतली. एका स्थानिक नेत्याची बांधकामे वाचवण्याचा प्रयत्न महापालिकेकडून झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. केडीएमसी आयुक्त ई. रवींद्रन यांनी चक्की नाका ते नेवाळी नाका या ३० मीटर लांब रस्त्याच्या रु ंदीकरणाची मोहीम मंगळवारी हाती घेतली. या कारवाईसाठी आयुक्तांनी प्रभाग अधिकारी शांतीलाल राठोड व प्रकाश ढोले यांच्याकडे आशीष हॉटेल ते व्दारली पाडापर्यंत तर अमित पंडित आणि प्रभाकर पवार यांच्याकडे व्दारली पाडा ते नेवाळी नाक्यापर्यंत दोन्ही बाजूकडील बांधकामे तोडण्याची जबाबदारी दिली होती. दरम्यान, चक्कीनाका पर्यंतचा रस्ता ८० फुटी केला असताना आता १०० फुटीचा अट्टाहास का? असा सवाल स्थानिकांनी केला होता. मंगळवारी पोलीस बंदोबस्तात सुरू झालेल्या कारवाईला प्रारंभी किरकोळ विरोध झाला. परंतु, एकीकडे घरांवर कारवाई होत असताना दुसरीकडे एका स्थानिक नेत्याची बांधकामे वाचवण्याचा महापालिकेचा सुरू असलेला खटाटोप पाहता रहिवाशांनी कारवाईला तीव्र विरोध केला. सायंकाळच्या सुमारास झालेल्या या विरोधामुळे कारवाई थांबवावी लागली. कारवाईच्या वेळी तो नेता घटनास्थळी ठाण मांडून होता, असे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)>दुमजली इमारतही पाडलीया कारवाईत दुकानांचे गाळे, खोल्या, गॅरेज, लहान हॉटेल्स, आणि दुमजली इमारती पाडण्यात आल्या. त्यासाठी पाच जेसीबी आणि दोन पोकलेनची मदत घेण्यात आली. या कारवाई दरम्यान महापालिकेचे १५ आणि उल्हासनगर पोलीस ठाण्याचे २०, असे ३५ पोलीस तर महापालिकेचे ५५ कर्मचारी तैनात होते.