शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सीट बेल्ट वापरण्याबाबत हलगर्जी

By admin | Updated: June 7, 2014 23:45 IST

सुरक्षेसाठी असलेला सीट बेल्ट वापरण्याबाबत वाहन चालक व मालक हलगर्जीपणा करताना दिसून येत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणातून आढळले आहे.

बुलडाणा : वाहन चालविताना सुरक्षेसाठी असलेला सीट बेल्ट वापरण्याबाबत वाहन चालक व मालक हलगर्जीपणा करताना दिसून येत असल्याचे ह्यलोकमतह्णने केलेल्या सर्वेक्षणातून आढळले आहे. यात वाहतुकीवर नियंत्नण ठेवणार्‍या शहर वाहतूक शाखेलाही फारसे गांभीर्य नसल्याचे दिसले असून, शहरात मागील एका महिन्यात अद्यापपर्यंत एकही कारवाई झाली नसल्याचे दिसून आले.केंद्रीय ग्रामविकास मंत्नी गोपीनाथ मुंडे यांनी प्रवासादरम्यान सीट बेल्ट बांधला असता तर कदाचित त्यांचे प्राण वाचू शकले असते, अशी भावना केंद्रीय आरोग्यमंत्नी डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केली आहे. याच वेळी त्यांनी गाडी चालविताना सुरक्षेची उपाययोजना म्हणून सीट बेल्ट बांधण्यासंदर्भात व्यापक जनजागृती मोहीम छेडण्याचेही जाहीर केले. आरोग्यमंत्र्यांच्या या विधानाच्या पृष्ठभूमीवर किती वाहनचालक सीट बेल्ट बांधून आपल्या जीवाची काळजी घेतात, या अनुषंगाने बुलडाणा शहरातील विविध चौकांमध्ये शनिवारी ७ जून रोजी दिवसा फेरफटका मारला. यावेळी जयस्तंभ चौक, कारंजा चौक, संगम चौक तसेच तहसील कार्यालय चौकात वाहनांचा सर्व्हे केला. त्यातून धक्कादायक बाब समोर आली आहे. शहरातील वर्दळीच्या संगम चौकात दुपारी १२.00 ते १२.१५ वाजेदरम्यान कार व जीप मिळून ३२ वाहने रवाना झाली. यातील एकाही वाहनचालकाने सीट बेल्ट बांधला नसल्याचे दिसले. नेमकी अशीच परिस्थिती शहरातील जयस्तंभ चौक, कारंजा चौक तसेच तहसील कार्यालय चौक आदी भागात दिसून आली. बोटावर मोजण्याइतपत वाहनचालकांकडे सीट बेल्ट होते; परंतु सीट बेल्ट कोणीही बांधले नसल्याचे दिसून आले. सीट बेल्ट न वापरणार्‍यांमध्ये शासकीय कार्यालयातील चालक तसेच महसूल व पोलिस विभागाचे कर्मचारीही दिसून आले.