शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
3
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
4
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
5
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
6
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
7
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
8
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
9
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
10
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
11
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
12
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
13
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
14
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
15
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
16
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
17
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
18
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
19
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
20
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!

हंगाम निम्म्यावर... कारखानदार गॅसवर..!

By admin | Updated: January 21, 2015 01:47 IST

राज्यातील साखर हंगाम निम्म्यावर व बाजारातील साखरेचे दर घसरल्याने कारखानदार मात्र गॅसवर अशी साखर उद्योगाची स्थिती बनली आहे.

विश्वास पाटील ल्ल कोल्हापूरराज्यातील साखर हंगाम निम्म्यावर व बाजारातील साखरेचे दर घसरल्याने कारखानदार मात्र गॅसवर अशी साखर उद्योगाची स्थिती बनली आहे. केंद्र सरकार या उद्योगास पॅकेज देणार आहे परंतु ते नेमके कधी मिळते, यासंबंधी ठोस माहिती नसल्याने कारखानदारचिंतेत आहेत.साखर आयुक्तालयाने राज्यातील १८ जानेवारीपर्यंतची हंगामाची गाळपाची माहिती उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार राज्यात ७६ खासगी कारखान्यांसह १७४ कारखाने सुरू आहेत. आतापर्यंत ४१९ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. त्यातून ४४७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा १०.६८ असून तो गतवर्षीच्या तुलनेत पाँईट १० ने जास्त आहे. हंगामाच्या सुरुवातीस किमान ६९७ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट जाहीर केले होते, परंतु परतीचा पाऊस व हवामानही उसाला पोषक राहिल्याने आतापर्यंत गाळप झालेल्या पूर्वहंगामी, आडसाली व सुरू या तिन्ही प्रकारांतील लागणीला चांगले टनेज मिळाले त्यामुळे यंदा ८०० लाख टन उसाचे गाळप होईल, असा सुधारित अंदाज व्यक्त केला आहे. या पुढील गाळप हे मुख्यत: खोडवा उसाचे असेल. त्यामुळे त्यास लागणी इतके प्रति एकर टनांचे उत्पादन मिळणार नाही तरीही आठशे लाख टन गाळप विचारात घेतल्यास यंदाचा हंगाम मार्चअखेरपर्यंत सुरू राहील. यंदा ऊस चांगला आहे परंतु बाजारातील साखरेने सगळे वांदे केले आहे. हा दर २५०० रुपये क्विंटलपर्यंत घसरल्याने कारखान्यांना एफआरपी देताना अडचणी आल्या आहेत. राज्य सरकार एका बाजूला मदतीसाठी प्रयत्न करत असताना दुसऱ्या बाजूला कारखान्यांवर कारवाईचा बडगाही उगारला आहे. त्यामुळे ही मदत झाली तरच कारखानदारांची अडचण दूर होईल. विभागकारखाने सुरूगाळपसाखर उत्पादनसाखर उतारा(कंसात खासगी)(लाख टन)(लाख क्विंटल)(टक्के)१)कोल्हापूर३७ (१०)९६.९२११५.४६११.९१२)पुणे५७ (२६)१६४.७८१७४.६२१०.६०३) अहमदनगर२३ (०९)५८.२२६०.८११०.४४४)औरंगाबाद२२ (०९)३७.२२३४.७७०९.३४५)नांदेड२९ (१७)५७.०१५७.२११०.०४६)अमरावती०२ (०१)०२.६९२.५९९.६५७) नागपूर०४ (०४)०२.२२२.०२९.०७एकूण१७४ (७६)४१९.०६४४७.४७१०.६८