शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील निम्मे पोलीस अद्याप वेतनाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: March 9, 2016 05:48 IST

आर्थिक वर्षअखेरीमुळे गुंतवणूक व खर्चाच्या रक्कमेची सांगड घालण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तर दुसरीकडे मुंबईकरांच्या रक्षणाची जबाबदारी असलेले मुंबई पोलीस दलातील निम्म्याहून अधिक

मुंबई: आर्थिक वर्षअखेरीमुळे गुंतवणूक व खर्चाच्या रक्कमेची सांगड घालण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तर दुसरीकडे मुंबईकरांच्या रक्षणाची जबाबदारी असलेले मुंबई पोलीस दलातील निम्म्याहून अधिक पोलीस अधिकारी-कर्र्मचारी वेतनाविना आहेत. मार्च महिन्याच्या पहिला आठवडा उलटूनही पगार न झाल्याने पोलिसांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. महागाई भत्ता व अन्य भत्त्यांची तसेच फरकाची रक्कम वेतनामध्ये समाविष्ट करण्याचे काम पूर्ण न झाल्याने वेतन होण्यास विलंब होत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.समाजात कायदा व सुव्यवस्था कायम होण्यासाठी कार्यरत असलेल्या पोलिसांना दर महिन्याच्या पहिल्या तारखेला कोणत्याही परिस्थितीत पगार वितरित करण्यात यावा, असे आदेश तीन वर्षांपूर्वी कॉँग्रेस आघाडी सरकारने गृह विभागाला बजाविले होते. मात्र ते आदेश केवळ कागदावरच आहेत. अतिरेक्याचे लक्ष्य असलेल्या मुंबईत ५० हजारांवर फौजफाटा कार्यरत आहे. त्यापैकी निम्म्या पोलिसांना मार्च महिन्याचे वेतन अदा करण्यात आले आहे. विविध प्रादेशिक विभाग व शाखेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा पगार मात्र अद्याप प्रलंबित आहे. मार्च महिन्यामुळे विविध प्रकारची कर्ज, तसेच ‘पॉलिसी’ व गुंतवणुकीच्या योजनांमध्ये पैसे भरण्याची धांदल सुरु असताना पगार न झाल्याने पोलिसांमध्ये नाराजी आहे. याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी महागाई, गणवेष व अन्य भत्त्यांचा समावेश वेतनात करावयाचा आहे. त्याच्या हिशेब करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे काहींच्या पगाराला विलंब होत असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)