शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

दीड लाख विद्यार्थिनी होणार ‘निर्भय’

By admin | Updated: March 8, 2016 02:42 IST

विविध अत्याचारांच्या प्रकारांमुळे मुली मानसिकदृष्ट्या खचत आहेत. त्यांना आत्मसंरक्षणासह कायदेविषयक तरतुदी, आदी स्वरूपातील माहिती

संतोष मिठारी,  कोल्हापूर विविध अत्याचारांच्या प्रकारांमुळे मुली मानसिकदृष्ट्या खचत आहेत. त्यांना आत्मसंरक्षणासह कायदेविषयक तरतुदी, आदी स्वरूपातील माहिती देऊन सक्षम करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने ‘निर्भय कन्या अभियान’ हाती घेतले आहे. याअंतर्गत विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सुमारे दीड लाख विद्यार्थिनींना ज्यूदो, कराटेच्या माध्यमातून आत्मसंरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळ आणि राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत (एनएसएस) हे अभियान राबविले जाणार आहे. याअंतर्गत विद्यापीठ परिसरातील विभागांमधील एक हजार ९०० आणि कोल्हापूर, सांगली व सातारा या कार्यक्षेत्रातील विविध महाविद्यालयांमधील सुमारे दीड लाख विद्यार्थिनींना निर्भय बनविले जाणार आहे. त्यांना कराटे-कुंग फू, लाठी-काठी, योगा, प्राणायाम यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच महिलांबाबत संविधानामधील कायदेविषयक तरतुदी, लैंगिक छळ प्रतिबंधक कायद्याविषयी माहिती देण्यात येणार आहे. वर्षभर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.निर्भय कन्या अभियानाची संकल्पना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी मांडली. त्यानुसार एनएसएस व विद्यार्थी कल्याण मंडळाच्या माध्यमातून हे अभियान राबविले जात आहे. जून-जुलैपासून अभियानाची व्याप्ती वाढविण्यात येणार असून प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थिनीआपले गाव, शहरातील अन्य मुली, विद्यार्थिनींना मार्गदर्शन करणार असल्याचे विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. डी. के. गायकवाड यांनी सांगितले.