शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दीड कोटी रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त :राज्य उत्पादन शुल्क

By admin | Updated: April 1, 2017 20:55 IST

रिक्त पदांची संख्या अधिक असूनही राज्य उत्पादन शुल्क विभागाने याहीवर्षी मोठ्या प्रमाणात अवैध मद्यवाहतूक करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई

 नाशिक : रिक्त पदांची संख्या अधिक असूनही राज्य उत्पादन शुल्क विभागाने याहीवर्षी मोठ्या प्रमाणात अवैध मद्यवाहतूक करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली असून, २ हजार २१९ गुन्हे नोंदवत एक हजार २८२ आरोपींना अटक करून १ कोटी ५३ लाख ४६ हजार ८७६ रुपयांचा अवैध मद्यसाठा पकडला आहे़ याबरोबरच अवैध मद्याची वाहतूक करणारी ५७ वाहने जप्त करण्यात आली असून त्यामध्ये दुचाकी, चारचाकी वाहनांचा समावेश असल्याची माहिती अधीक्षक आऱजी़ आवळ यांनी दिली आहे़राज्य उत्पादन शुल्क विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून दारू उत्पादनावर लक्ष ठेवणे व बेकायदा दारू विक्री, वाहतूक, बनावट मद्यनिर्मिती रोखण्याची तसेच कारवाई करण्याची जबाबदारी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे आहे; मात्र या विभागाकडे कारवाई करण्यासाठी पुरेसे कर्मचारी व वाहनांची कमतरता आहे़; मात्र याही परिस्थितीत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जोरदार कारवाई सुरू आहे़उत्पादन शुल्क विभागातील उपअधीक्षक पी़ एऩ पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक वर्षी महसुलात वाढ होत आहे़ उत्पादन शुल्क विभागाने २०१६-१७ या आर्थिक वर्षात बनावट विदेशी मद्य आणि हातभट्टी दारू उत्पादन प्रकरणी आतापर्यंत २ हजार २१९ गुन्हे दाखल करून १ हजार २८२ आरोपींवर गुन्हे दाखल करून कारवाई केली आहे़ यापैकी एक हजार २३९ गुन्ह्यांमध्ये आरोपी सापडले असून, ९८० गुन्ह्यांमध्ये आरोपी सापडलेले नाहीत़

गतवर्षात अर्थात एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ या कालावधीत २ हजार १५० गुन्ह्यांची नोंद केली आहे. त्यापैकी ९९८ गुन्हे बेवारस आहेत. १ हजार १५२ वारस गुन्ह्यांमध्ये म्हणजे ज्या छाप्याच्या कारवाईत आरोपी सापडले तेथून १ हजार १५६ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. यावर्षात १ कोटी ३२ लाख ६ हजार २५२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता़ तर २०१६ -२०१७ मध्ये १ कोटी ५३ लाख ४६ हजार ८७६ रुपयांचा अवैध मद्यसाठा पकडला आहे़