शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

न्यायाधीशांची निम्मी पदे रिक्त

By admin | Updated: March 27, 2016 01:19 IST

नागरिकांना न्याय मिळवून देणाऱ्या न्यायव्यवस्थेचा गाडा न्यायाधीशांच्या रिक्त पदांमुळे अडखळत पुढे चालला आहे. सर्वोच्च न्यायालयासह देशभरातील उच्च न्यायालयांमधील

- राजानंद मोरे,  पुणेनागरिकांना न्याय मिळवून देणाऱ्या न्यायव्यवस्थेचा गाडा न्यायाधीशांच्या रिक्त पदांमुळे अडखळत पुढे चालला आहे. सर्वोच्च न्यायालयासह देशभरातील उच्च न्यायालयांमधील न्यायाधीशांची जवळपास निम्मी पदे रिक्त आहेत. त्यामुळे उच्च न्यायालयातील प्रलंबित खटल्यांची संख्या वाढत चालली असून न्याय मिळण्यासाठी विलंब होत आहे. न्यायव्यवस्थेकडे मागील काही वर्षांपासून दुर्लक्ष झाले आहे. देशातील तालुकास्तरापासून असलेल्या न्यायालयांमध्ये दाखल होणाऱ्या प्रकरणांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यातील बरीचशी प्रकरणे उच्च न्यायालयापर्यंत पोहोचतात. तर थेट उच्च न्यायालयांमध्ये दाखल होणाऱ्या प्रकरणांचे प्रमाण अधिक आहे. मात्र, न्यायाधीशांच्या रिक्त पदांमुळे प्रकरणांचा निपटारा होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे प्रलबिंत प्रकरणांची संख्या वाढतच चालली आहे. सर्वोच्च न्यायालयासह देशातील २४ उच्च न्यायालयांमध्ये १ मार्च २०१६ अखेर न्यायाधीशांची एकुण मंजुर पदे १०५६ असून त्यापैकी तब्बल ४५ टक्के म्हणजे ४६५ पदे रिक्त आहेत. त्यामध्ये एकट्या अलाहाबाद उच्च न्यायालयात ८८ तर त्याखालोखाल मद्रास उच्च न्यायालयात ४० पदे रिक्त आहेत. हैद्राबाद व मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीशांची अनुक्रमे ३५ व ३४ पदे रिक्त आहेत. सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशांची ३१ मंजुर पदे असून ६ पदे रिक्त आहेत. देशातील विविध न्यायालयांमध्ये एकुण २ कोटी १२ लाख प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यापैकी दिवाणी स्वरूपाच्या प्रकरणांची संख्या सुमारे १ कोटी ४१ लाख एवढी आहे. एकुण प्रलंबित प्रकरणांमध्ये २ वर्षांपेक्षा कमी कालावधीची प्रकरणे ४२.२९ टक्के आहेत. तर दहा वर्षांहून अधिक काळापासून सुरू असलेल्या खटल्यांचे प्रमाणही लक्षणीय आहे. हे प्रमाण सुमारे साडे दहा टक्के एवढे आहे. सद्यस्थितीत देशात प्रलंबित खटल्यांमध्ये उच्च प्रदेश हे राज्य आघाडीवर आहे. या राज्यांतील विविध न्यायालयांमध्ये ५० लाखांहून अधिक खटले प्रलंबित आहेत. त्याखालोखाल महाराष्ट्राचा क्रमांक असून राज्यातील प्रलंबित प्रकरणांची संख्या २६ लाखांहून अधिक आहे. प्रलंबित प्रकरणांचा आकडा खूप मोठा असल्याने न्यायव्यवस्थेवरील ताण वाढत चालला आहे. हा ताण कमी करण्यासाठी न्यायाधीशांची रिक्त पदे भरणे आवश्यक बनले आहे.