शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

गुंतवणुकीचे निम्मे ‘मेक इन’ राज्यात!

By admin | Updated: February 19, 2016 03:49 IST

भारतात तब्बल १५ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार केले असून त्यातील निम्म्याहून अधिक म्हणजे ७ लाख ९४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात होणार आहे.

मुंबई : मेक इन इंडिया सप्ताहात देशविदेशातील उद्योगांनी भारतात तब्बल १५ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार केले असून त्यातील निम्म्याहून अधिक म्हणजे ७ लाख ९४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात होणार आहे. त्याद्वारे तब्बल ३० लाख रोजगार उपलब्ध होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. १३ फेब्रुवारीपासून बीकेसी मैदानावर सुरू असलेल्या या सप्ताहाचे आज सूप वाजले. गुंतवणुकीच्या आघाडीवर त्याचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्राला झाला आहे. या सप्ताहात राज्यातील गुंतवणुकीसाठी झालेल्या करारांच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासन विशेष टास्क फोर्सची स्थापना करेल, असे मुख्यमंत्र्यांनी समारोपानंतर सांगितले. या गुंतवणुकीचा आढावा राज्य प्रशासन दर महिन्याला घेईल, असे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी जाहीर केले. सप्ताहाचा समारोप झाला असला तरी महाराष्ट्राच्या दृष्टीने आजपासून मेक इन इंडिया अन् महाराष्ट्रचे मिशन सुरू झाले. या सप्ताहानिमित्त राज्याराज्यांमध्ये निकोप स्पर्धा दिसली. देशाची आणि महाराष्ट्राची ताकद जगाला दिसली, असे मुख्यमंत्री म्हणाले. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, केंद्रीय औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभागाचे सचिव अमिताभ कांत, केंद्रीय सचिव रमेश अभिषेक आदी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)मराठवाडा, विदर्भात १.५० लाख कोटीऔद्योगिकदृष्ट्या मागासलेल्या मराठवाडा व विदर्भ विभागात १ लाख ५० हजार कोटी रु पयांच्या गुंतवणुकीचे करार झाले. खान्देशात २५ हजार कोटी रु पये, पुणे विभागात ५० हजार कोटी, तर मुंबईसह कोकण विभागात ३ लाख २५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. उर्वरित विभागवार गुंतवणुकीची आकडेवारी लवकरच जाहीर केली जाणार आहे.