शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत पगाराएवढा फेरीवाल्याला द्यावा लागतो हफ्ता, सेना नगरसेवकाकडून रेटकार्ड जाहीर

By admin | Updated: June 12, 2017 22:14 IST

शिवसेना उपोषणाला बसली आहे. तसेच शिवसेनेनं फेरीवाल्यांचं रेटकार्डही जाहीर करून टाकलंय.

ऑनलाइन लोकमत

डोंबिवली, दि. 12 - गेल्या काही दिवसांपासून केडीएमसीत फेरीवाल्यांचा उच्छाद दिवसेंदिवस वाढला आहे. त्यात जास्त करून डोंबिवलीत फेरीवाला आणि पालिका यांची अभद्र युती झाल्याचं चित्र समोर आलं आहे. अधिका-यांचं पाठबळ असल्यानं फेरीवाल्यांविरोधात सत्ताधारी शिवसेनेनं आंदोलनं करूनही फेरीवाले निर्ढावलेले आहेत. त्यामुळे आता चक्क शिवसेना उपोषणाला बसली आहे. तसेच शिवसेनेनं फेरीवाल्यांचं रेटकार्डही जाहीर करून टाकलंय.अधिका-यांचं पाठबळ असल्यानं फेरीवाल्यांविरोधात सत्ताधारी शिवसेनेनं आंदोलनं करूनही फेरीवाले बिनधास्त आहेत. त्यामुळे आता चक्क शिवसेना उपोषणाला बसला आहे. तसेच शिवसेनेनं फेरीवाल्यांचं रेटकार्डही जाहीर करून टाकलंय.

केडीएमसीत शिवसेना सत्ताधारी असतानाही त्यांच्यावर आंदोलन करण्याची वेळ येत आहे. शिवसेनेकडून अनेक आंदोलनं करूनही फेरीवाल्यांना काही हटायला तयार नाहीत. त्यामुळे अखेर शिवसेनेवर उपोषण करण्याची नामुश्की ओढावली आहे. शिवसेनेचे नगरसेवक वामन म्हात्रे यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. आम्ही सत्ताधारी असूनही प्रशासन कारवाई करत नसल्याची खंत म्हात्रे यांनी बोलून दाखवली. त्यानंतर त्यांनी थेट पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी किती हप्ते घेतात, याचं  रेटकार्डच जाहीर करून टाकल्यानं एकच खळबळ उडाली आहे. 

फेरीवाल्यांकडून मिळणाऱ्या हफ्त्यांचे  रेटकार्ड

महापालिका मुख्यालयासमोर - 30 हजार रुपये प्रति महिना

मधुबन टॉकीज फुटपाथ - 15 हजार रुपये आठवड्याला

रामनगरपर्यंत रात रोड - 17 हजार रुपये आठवड्याला

रामनगर आरटीओसमोर - 20 हजार रुपये प्रति महिना

केळकर रोड आणि शिवमंदिर - 10 हजार रुपये आठवड्याला

फुलवाले - 1 हजार 500 रुपये,

कपडेवाले - 2 हजार रुपये,

दाबेलीवाला - 3 हजार रुपये,

फरसाण - 3 हजार रुपये,

चायनीज - 3 हजार रुपये,

पाणीपुरीवाला - 2 हजार रुपये,

सरबतवाला - 4 हजार,

चहा आणि ताकवाला - 4 हजार रुपये,

चप्पलवाला - 5 हजार रुपये ( महिन्याला)