शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सात वर्षात फेडावे लागणार निम्मे कर्ज, अर्थमंत्री मुनगंटीवार यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 01:43 IST

महाराष्ट्रावरील कर्जाच्या डोंगरावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप होत असतात. राज्यावरील या प्रचंड कर्जापैकी निम्म्या कर्ज पुढील सात वर्षात फडावे लागणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरात दिली.

मुंबई : महाराष्ट्रावरील कर्जाच्या डोंगरावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप होत असतात. राज्यावरील या प्रचंड कर्जापैकी निम्म्या कर्ज पुढील सात वर्षात फडावे लागणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरात दिली.राज्य सरकारने करवसुलीच्या रचनेत सुधारणा करण्याबाबतचा तारांकित प्रश्न काँग्रेस सदस्य अनंत गाडगीळ यांनी विचारला होता. राज्याला कर्जाची परतफेड करावी लागणार असल्याने अर्थव्यवस्थेवर ताण पडेल असा इशारा भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक (कॅग) यांनी ३१ मार्च २०१६ला संपलेल्या वर्षाच्या अहवालात दिला आहे. त्यामुळे करवसुलीच्या रचनेत सुधारणा करण्याबाबात कोणती कार्यवाही केली, असा सवाल गाडगीळ यांनी केला होता. त्यावरील लेखी उत्तरात अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी पुढील सात वर्षात राज्यावरील एकूण कर्जापैकी ५१.५ टक्के कर्जाची परतफेड करावी लागणार असल्याचे सांगितले.राज्य सरकारला २०१९-२१ दरम्यान ३७,७६१.४२ कोटी आणि २०२१-२३ या कालावधीत ४९,२६१.४२ कोटी इतक्या कर्जाच्या रकमेची परतफेड करावी लागणार आहे. राज्य सरकारच्या देशांतर्गत कर्जामध्ये ६६.५१ टक्के बाजार कर्जांचा समावेश आहे. या कर्जाच्या परतफेडीचा कालावधी १० वर्षे असल्याने पुढील सात वर्षात देशांतर्गत कर्जाच्या५१.५० टक्के रकमेची परतफेड करणे अपेक्षित आहे. राज्य सरकार विकास कामांसाठी प्रत्येक वित्तीय वर्षात बाजारातून कर्जे घेते.या कर्जाची परतफेडीचीप्रक्रिया निरंतर सुरू राहणार असल्याचेही अर्थमंत्र्यांनी लेखीउत्तरात म्हटले. राज्यातर्फे वसूल केल्या जाणा-या करासंदर्भात व अपिलामध्ये अडकलेल्या महसूलाबाबत जलदगतीने निर्णय घेण्याचे तसेच प्रलंबित वसूलीची कार्यवाही करविभागाकडून करण्यात येत असल्याचेही अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले.