शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

‘हाजी अलीतील महिला प्रवेशाचा वाद कोर्टाबाहेर सोडवा’

By admin | Updated: November 18, 2015 03:00 IST

आता वातावरण असे आहे की, लोक प्रत्येक गोष्टीचा दुसरा अर्थ घेतात. हे युग असहनशिलतेचे आहे. जेव्हा एखादी गोष्ट धर्मावर येते, तेव्हा लोक अत्यंत संवदेनशील होतात, असे म्हणत

मुंबई: आता वातावरण असे आहे की, लोक प्रत्येक गोष्टीचा दुसरा अर्थ घेतात. हे युग असहनशिलतेचे आहे. जेव्हा एखादी गोष्ट धर्मावर येते, तेव्हा लोक अत्यंत संवदेनशील होतात, असे म्हणत उच्च न्यायालयाने हाजीअली दर्ग्यात महिलांना जाण्यास घातलेल्या बंदीचा प्रश्न न्यायालयाबाहेर सोडवण्याची सूचना ट्रस्टला केली.२०१२ मध्ये हाजीअली दर्ग्यात जाण्यापासून महिलांना मनाई करण्यात आली. याविरुद्ध सामाजिक कार्यकर्त्या नूरजहाँ निआझ आणि झाकिया सोमण यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. व्ही. एम. कानडे व न्या. रेवती मोहिते -डेरे यांच्या खंडपीठापुढे होती. अशी प्रकारच्या केसेसचा लोकांनी अन्य अर्थ लावण्याचा प्रयत्न करू नये, असे याचिकाकर्तींचे वकील राजू मोरे यांनी म्हटल्यावर खंडपीठाने वरील निरीक्षण नोंदवले.धार्मिक बाबींमध्ये सहसा न्यायालय हस्तक्षेप करत नाही. खरंतर ट्रस्टने हा वाद न्यायालयाबाहेरच मिटवला पाहिजे, असे खंडपीठाने म्हणत या याचिकेमध्ये कोणत्याही प्रकारचे आदेश देण्यास अनुकुलता न दाखवल्याने अ‍ॅड. मोरे यांनी हे प्रकरण धार्मिक नसून लिंगभेदाचे असल्याचे खंडपीठाला सांगितले.गेल्या सुनावणी वेळी ट्रस्टने पुरुष संतांच्या कबरीजवळ महिलांनी जाणे म्हणजे महापाप आहे, असे खंडपीठाला प्रतिज्ञापत्राद्वारे सांगितले होते. खंडपीठाने धर्मदाय आयुक्तांना ट्रस्ट डीड आणि योजनांची कागदपत्रे याचिकाकर्त्यांना देण्याचा आदेश देत या याचिकेवरील पुढील सुनावणी १५ डिसेंबर रोजी ठेवली आहे. (प्रतिनिधी)