शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

हाजी अली दर्ग्यात महिलांच्या प्रवेशासाठी पुरोगामी एकवटले

By admin | Updated: April 21, 2016 05:14 IST

हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश मिळावा म्हणून पुरोगामी संघटना आणि व्यक्तींनी एकत्र येत ‘हाजी अली सब के लिए’ फोरमची स्थापना केली आहे.

मुंबई : हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश मिळावा म्हणून पुरोगामी संघटना आणि व्यक्तींनी एकत्र येत ‘हाजी अली सब के लिए’ फोरमची स्थापना केली आहे. या फोरममध्ये भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनीही उडी घेतली आहे. २८ एप्रिलला हाजी अली दर्ग्याबाहेर धरणे आंदोलन केले जाणार आहे.हाजी अली दर्ग्यात २०११ सालापर्यंत महिलांना प्रवेश देण्यात येत होता. मात्र त्यानंतर ट्रस्टची कमिटी बदलली आणि महिलांना प्रवेश नाकारण्यात आला. त्यासाठी वेगवेगळी कारणे देण्यात आली. त्यामुळे महिलांना प्रवेश नाकारण्यामागे कोणतेही धार्मिक कारण नसल्याचा युक्तिवाद फोरमचे जावेद आनंद यांनी केला आहे. आनंद म्हणाले की, कोणत्याही धर्माला किंवा जातीला फोरमचा विरोध नाही. चुकीच्या रूढी-परंपरांना विरोध आहे. माहिमच्या मगदूम शाह बाबा दर्गामध्ये महिलांना प्रवेश दिला जात असताना हाजी अलीला प्रवेश नाकारणे चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले. महत्त्वाची बाब म्हणजे या दोन्ही दर्गाच्या विश्वस्तपदी एकच समिती असल्याचा खुलासाही त्यांनी केला आहे.त्र्यंबकेश्वरच्या घटनेचा निषेधत्र्यंबकेश्वरमध्ये प्रवेश करू पाहणाऱ्या महिलांना झालेल्या अमानुष मारहाणीचा तृप्ती देसाई यांनी निषेध व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, पोलिसांच्या उपस्थितीत महिलांना बेदम मारहाण होत असेल, तर गृहमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांनी याचे स्पष्टीकरण द्यायला हवे. शिवाय कोर्टाच्या आदेशानंतरही महिलांना प्रवेश नाकारणाऱ्या मंदिराच्या ट्रस्टी या स्वत: न्यायाधीश आहेत. त्यामुळे सरकारने त्यांना सरकारी सेवेतून पायाउतार करण्याची मागणीही त्यांनी केली. गुरूवारी या घटनेचा समाचार घेण्यासाठी त्र्यंबकेश्वरला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.