शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

गारपिटीत पानमळा शेतीचा आधार !

By admin | Updated: April 20, 2015 02:19 IST

दुष्काळ अन् वारंवारच्या नैसर्गिक संकटावर मात करण्यासाठी पारंपरिक पिकांना फाटा देत नांदेड जिल्ह्यातील चाभरा (ता. हदगाव) येथील सुमारे २५ शेतकऱ्यांनी पानमळा

रामेश्वर काकडे, नांदेडदुष्काळ अन् वारंवारच्या नैसर्गिक संकटावर मात करण्यासाठी पारंपरिक पिकांना फाटा देत नांदेड जिल्ह्यातील चाभरा (ता. हदगाव) येथील सुमारे २५ शेतकऱ्यांनी पानमळा शेतीचा नवा पॅटर्न निर्माण केला आहे. विशेष म्हणजे गारपिटीने कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना या पिकाने मोठा आर्थिक आधार दिला आहे. मराठवाड्यात चर्चेच्या ठरलेल्या या प्रयोगाची पाहणी करण्यासाठी शेतकरी चाभरा गावाला भेट देत आहेत. सिंचन व्यवस्थेने चाभरा गाव आर्थिकदृष्ट्या सक्षम असून, शेतकरी केळी, हळदीसह सोयाबीन, कापसाला पसंती देतात. मात्र दरवर्षी नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागत असून, बाजारात कापूस, सोयाबीन या पिकांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत अल्प भाव मिळतो. त्याउलट नागवेलींच्या पानांना १२ महिने चांगला भाव मिळत असल्याने अनेक तरुण शेतकरी पानमळा शेतीकडे वळले व त्यांनी एकत्रितपणे नवा पॅटर्न राबविला. त्यातून इतर शेतकरीही पानमळा शेती करण्याचा विचार करीत आहेत.पाच वर्षांपूर्वी रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने जिल्ह्यात पानमळा शेतीचे क्षेत्र घटले होते. मात्र सध्या पानमळा शेतीत चाभरा गाव नांदेड जिल्ह्यात आघाडीवर असून, त्यानंतर बारडच्या दोन शेतकऱ्यांनी पानमळ्याला प्राधान्य दिले आहे. ईश्वर उमाजी मरकुंदे यांनी त्यांच्या २५ एकर शेतीमधील साडेतीन एकरात नागवेली पानाच्या कपुरी जातीची लागवड केली. प्रथमत: शेवरी, शेवगा यांची जून महिन्यात सरी पद्धतीने लागवड करीत सप्टेंबरमध्ये शेवग्याच्या बुुंध्याशी नागवेलीची दोन फुटांच्या अंतराने लागवड केली. लागवडीपूर्वी शेणखताचा वापर केला. विशेष म्हणजे पाऊस, गारपिटीमुळे नुकसान होऊ नये, यासाठी पानमळा नेटच्या कपड्याने संरक्षणाचा नवा मार्ग अवलंबिला आहे. पानमळ्यातून वर्षाकाठी एकरी चार ते साडेचार लाखांचे उत्पादन निघते. त्यातून दोन लाखांचा लागवडीचा खर्च वजा जाता दोन ते अडीच लाखांचे उत्पन्न हाती लागते. त्यातून शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे. नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, राहता येथील बाजारपेठेत चाभऱ्यातील शेतकरी पाने विक्रीसाठी नेतात. एक हजार पानांना २५० ते ५०० रुपयांपर्यंतचा भाव मिळतो. पावसाळ्याच्या दिवसांत निघणाऱ्या नागवेलीच्या कोवळ्या पानांना परभणीच्या बाजारपेठेत मोठी मागणी आहे.