शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

राजेवाडीत गारपीट, डाळिंबांच्या बागा उद्ध्वस्त

By admin | Updated: June 10, 2014 23:26 IST

पुरंदर तालुक्याच्या पूर्वभागात वादळी वार्‍यासह गारपिटीने डाळिंब, ऊस, पावटा, गुलछडी, मका यांसारख्या सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

राजेवाडी : पुरंदर तालुक्याच्या पूर्वभागात वादळी वार्‍यासह गारपिटीने डाळिंब, ऊस, पावटा, गुलछडी, मका यांसारख्या सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काल दि. ९ रोजी सायंकाळी ५ वाजता वादळी वार्‍यासह जोरदार पावसाने सुरुवात केली. वादळी वार्‍यासह राजेवाडीतील नवीन रेल्वे स्टेशनजवळील रानमळा, तक्रारवाडी, वायकरवाडी, स्वामी समर्थ मठ परिसरात अर्धा तास गारपीट सुरू होती. या गारपिटीने संभाजी नामदेव जगताप, अमृता जगताप, हरिभाऊ जगताप, दत्तात्रय जगताप यांच्यासह अनेक शेतकर्‍यांच्या डाळिंबांच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. आतापर्यंतच्या गारपिटीत वादळी वार्‍यामध्ये बागा वाचल्या होत्या. मात्र, कालच्या गारपिटीने सर्व डाळिंबांचे नुकसान झाले असून, पावटा, गुलछडी, कापरी यांसारख्या फुलांची शेतीही उद्ध्वस्त झाली आहे. आतापर्यंत ऐन उन्हाळ्यात शेतकर्‍यांनी जिवाचा आटापिटा करून बागा लाखो रुपये खर्च करून वाढवल्या होत्या. मात्र, गारपिटीने प्रचंड नुकसान झाल्याचे लालूअण्णा जगताप यांनी सांगितले. या गारपिटीची माहिती मंडल अधिकारी सुरेश कुंभार यांना शेतकर्‍यांनी दिली. तालुका कृषी अधिकारी ढगे यांनी कृषी सहायक जगताप व गाव कामगार तलाठी यांना वस्तुस्थितिजन्य पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, ज्या शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे, अशा सर्व नुकसानीचा पंचनामा करून तहसील कार्यालयात सादर करणार असल्याचे मंडलाधिकारी सुरेश कुंभार यांनी सांगितले. वादळी वार्‍याने विद्युत पुरवठा खंडित, २० खांब पडले वादळी वार्‍यासह जोरदार पावसाने राजेवाडी महावितरण कार्यालयाअंतर्गत येणार्‍या मावडी येथील ११ के. व्ही. चे ३ खांब, सिमेंटचे ३ खांब, पिसर्वे येथील २ खांब, नायगाव व राजुरी येथील १० खांब पडले. रात्रभर युद्धपातळीवर कामे सुरू असून, लवकरात लवकर विद्युतपुरवठा सुरळीत करणार असल्याची माहिती राजेवाडी येथील महावितरणचे शाखा अभियंता अमोल जाधव यांनी दिली.