पुणे : राज्यावर गारपिटीचे संकट कायम असून, सोमवारी मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे. रविवारीही राज्याच्या काही भागात जोरदार पाऊस पडला. राज्यातील उकाडाही वाढत चालला असून, रविवारी मालेगाव येथे सर्वाधिक ४१.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.मागील चार-पाच दिवसांपासून ठिकठिकाणी अवकाळी पाऊस सुरू आहे. रविवारी काही भागात पाऊस झाला. पुणे वेधशाळेकडे सायंकाळी सहा वाजेपर्यंत झालेल्या नोंदीनुसार पुणे, महाबळेश्वर व अकोल्यात पाऊस पडल्याची नोंद झाली. तसेच कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही भागात पाऊस पडला.रविवारी कोकण व विदर्भातील काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. मालेगाव येथे सर्वाधिक ४१.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
गारपिटीचा इशारा
By admin | Updated: March 30, 2015 04:48 IST