शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

ओला, उबर चालक आंदोलन तीव्र करणार

By admin | Updated: March 11, 2017 01:15 IST

मनमानी पद्धतीने कंपन्यांची सुरू असलेली दंडवसुली तसेच कंपन्यांकडून दिले जाणारे कमी उत्पन्न याविरोधात नाराज असणाऱ्या ओला, उबरच्या भागीदार चालकांनी

मुंबई : मनमानी पद्धतीने कंपन्यांची सुरू असलेली दंडवसुली तसेच कंपन्यांकडून दिले जाणारे कमी उत्पन्न याविरोधात नाराज असणाऱ्या ओला, उबरच्या भागीदार चालकांनी शुक्रवारी एक दिवसीय संप पुकारला होता. या संपाचा सर्वसामान्य मुंबईकरांवर मात्र फारसा परिणाम झाला नाही. ओला, उबरचा पर्याय स्वीकारणाऱ्यांना मात्र त्याचा फटका बसला. आपल्या मागण्यांवर योग्य विचार न केल्यास २१ मार्चपासून बेमुदत संपाचा इशारा चालकांकडून देण्यात आला आहे. तर १४ मार्च रोजी धरणे आंदोलन केले जाईल. व्यवसायाची हमी मिळावी, महिन्याला सव्वा लाख रुपये उत्पन्न मिळवून देण्याचे आश्वासन कंपनीकडून दिले जात असतानाच अत्यंत कमी उत्पन्न दिले जाते. त्यामुळे सव्वा लाख रुपयेच उत्पन्न प्राप्त करून देणे, चालकांवर मनमानी पद्धतीने सुरू असलेली दंडवसुली बंद करणे आणि सध्याच्या चालकांना उत्पन्न मिळवून देण्याअगोदरच वाहनांची संख्या वाढवण्यावर देण्यात आलेला भर चुकीचे असून, ते बंद करणे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्यांसाठी शुक्रवारी मुंबईत ओला, उबरच्या कार्यालयांसमोर चालकांकडून धरणे आंदोलन करत एक दिवसीय संप पुकारण्यात आला होता. मुंबईत जवळपास १५ हजारपेक्षा जास्त चालक आणि वाहने आहेत. पुकारण्यात आलेल्या एक दिवसीय संपात काही चालकांनीच सहभाग घेतला. आता १४ मार्चला आझाद मैदानात धरणे आंदोलन तर २१ मार्चपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला. आमच्या मागण्यांवर योग्य विचार न केलास आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा टूरिस्ट चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष राजू पाटील यांनी दिला. (प्रतिनिधी)