शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

ओला-उबरला ‘टायगर’ची टक्कर

By admin | Updated: July 13, 2017 02:14 IST

मुंबईकरांना अ‍ॅप बेस वातानुकूलित टॅक्सी प्रवासासाठी आता नवा पर्याय मिळाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईकरांना अ‍ॅप बेस वातानुकूलित टॅक्सी प्रवासासाठी आता नवा पर्याय मिळाला आहे. ‘टायगर’ नावाच्या अ‍ॅप बेस टॅक्सी सेवेचे लोकार्पण बुधवारी करण्यात आले. प्रवाशांसाठी मोफत वाय-फाय, वातानुकूलित प्रवास आणि कॅशलेस सुविधांयुक्त तब्बल ५ हजार टॅक्सी मुंबईत धावणार आहेत. त्यामुळे ‘अ‍ॅप बेस टॅक्सी’ सेवेच्या शर्यतीत आणखी एक स्पर्धक आला आहे. या स्पर्धेतून मुंबईकरांना तत्पर सेवा मिळणे, अधिक सोपे होणार आहे. कोलकाता येथील या ‘अ‍ॅप बेस टॅक्सी’ सेवेमुळे काळ्या-पिवळ्या टॅक्सींसह ओला-उबरच्या शर्यतीत आणखी एक स्पर्धक वाढला आहे. इंदोर आणि रांची शहरांतदेखील ही अ‍ॅप बेस टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली आहे. काळी-पिवळी टॅक्सीच्या ‘आमची ड्राइव्ह’ या अ‍ॅपसह ओला, उबर, मेरू, ईजी कॅब, टॅब कॅब या कंपन्यांची अ‍ॅप बेस टॅक्सी सेवा सध्या मुंबईत सुरू आहे. त्यात ‘टायगर’च्या ५ हजार टॅक्सींची भर पडल्याने मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर होण्याची शक्यता आहे. टायगर अ‍ॅपमध्ये हॅचबॅक, सीडेन आणि एसयूव्ही संवर्गाच्या पहिल्या तीन किलोमीटरसाठीचे बेस फेअर अनुक्रमे ५०, ६० आणि १०० रुपये असणार आहे. तर त्यापुढील प्रतिकिलोमीटर साठी अनुक्रमे १३, १५ आणि १८ रुपये मोजावे लागणार आहे.बी२बी (बिझनेस टू बिझनेस) आणि बी२सी (बिझनेस टू कन्झ्युमर) या तत्त्वावर ही सेवा चालणार आहे. प्रवाशांना परवडणाऱ्या किमतीमध्ये टॅक्सी सेवा सुरू केल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पोद्दार यांनी सांगितले. ते म्हणाले की, भविष्यात बाइक टॅक्सीसह, माल वाहतूक, रुग्णवाहिका अशा सुविधादेखील या अ‍ॅपवर पुरवण्यात येतील.>मुंबईकरांसाठी अ‍ॅपबेस सेवेची तुलना अ‍ॅप बेस सेवा बेस फेअरबेस फेअर नंतरचे भाडेटायगर ५० (प्रति ३ किमी) १३मेरु २७ (प्रति १ किमी)२०उबर ७० (प्रति १ किमी)१०ओला १०० (प्रति ४ किमी)११ईजी कॅब २७ ( प्रति १ किमी)२०टॅब कॅब ९० ( प्रति ४ किमी)२२