शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमगडमधील खाचरे पाण्यात

By admin | Updated: July 4, 2016 03:47 IST

सद्यस्थितीत पावसाचा जोरदार तडाखा सुरु असुन याचा परिणाम सर्वच स्तरावर होतांना दिसत आहे.

राहुल वाडेकर,

विक्रमगड- सद्यस्थितीत पावसाचा जोरदार तडाखा सुरु असुन याचा परिणाम सर्वच स्तरावर होतांना दिसत आहे. अतिपावसामुळे भातशेती धोक्यात येण्याची शक्यता शेतकरी वर्गाकडून वर्तविण्यात येत आहे.जास्त पावसामुळे पेरण्यात आलेले भात,तसेच तयार होत असलेली भात रोपे कुजण्याचा संभव असून त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची चिन्हे दिसत आहेत.तर विक्रमगड आपत्कालीन कार्यालयास भेट दिली असता त्यांनी येत्या ४८ तासांत अतिवृष्टीचे संकेत ठाणे कट्रोल विभागाकडून देण्यांत आल्याचे सांगितले.याबाबत तत्काळ सर्व शासकीय यंत्रणा, कार्यालयीन विभागास खबरदारीच्या सूचना देण्यांत आल्या असून नागरिकांना आवाहन करण्यांत आले की,खबरदारी घेऊन बाहेर जाणे शक्यतो टाळावे, प्रवास टाळावा व खबदारी घ्यावी, दरम्यान गेल्या तीन दिवसांत विक्रमगडमध्ये १८० मि.मि,तलवाडयात २५० मि.मि.व आतापर्यत विक्रमगड-५३९.५ तर तलवाडा-६५३ मि.मि.पावसाची नोंद करण्यांत आल्याचेही सांगण्यात आले. गेल्या वर्षी जून,जुलै कोरडेच गेले होते तर यंदा जूनच्या पंधरवडयापासून चालू झालेला पाउस थांबतच नसल्याने भातशेती धोक्यात आल्याने शेतकरी वर्ग चिंंतेत सापडला आहे.भात लावणीकरीता पावसाची आवश्यकता असते परंतु अति पावसामुळे भातरोपे कुजण्याचा संभव आहे.अजुनही अनेक शेतकऱ्यांची पेरणीची कामे खोळंबली आहेत.तर अनेक भागात रोपे तयार होत आहे.त्यानंतर लावणीची कामे होतील.सद्यस्थित जरी परिस्थिती आटोक्यात असली तरी पावसाचे प्रमाण असेच राहील्यास शेतीस धोका निर्माण होउ शकतो असे जाणकार शेतकऱ्यांकडुन सांगीतले जात आहे. दरम्यान अतिपावसामुळे रस्त्यांची नुसती चाळणझाली आहे.तर नदी नाले ओसांडुून वाहत असल्याने गावातील-खेडयातील जनतेचा शहराशी दोन दोन दिवस संपर्क होत नाही.कामे रेंगाळली आहेत.वाहतुक मंदावलेली आहे. कमी उंची असलेल्या पुलावरुन पाणी वाहतांना दिसत आहे. दरम्यान सर्वत्र पावसाने थैमान घातलेले असून काहीकाळ पावसाने विश्रांती घ्यावयास हवी जेणेकरुन उर्वरीत शेतीची कामे योग्य पध्दतीत होऊन शेतीसाठी उपयुक्त ठरेल अशी भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.यंदा पावसाचे प्रमाण गेल्यावर्शीपेक्षा चांगले आहे. त्यामुळे शेतीकामांना वेग आलेला आहे. शेतकरी शेतीच्या कामांत गुुंतलेले दिसत आहेत.तालुक्यात आतपर्यत विक्रमगड सेक्शनमध्ये ५४० मि.मि तर तलवाडा सेक्शनमध्ये ६५३ मि.मि पावसाची नोंद करण्यांत आली असुन पावसाचा जोर कायम आहे.- आयुब तांबोळी, निवासी नायब तहसिलदार