शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
3
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
4
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
5
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
6
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
7
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
8
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
9
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
10
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
11
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
12
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
13
लोकांची उष्टी भांडी घासून गरीब वडिलांनी शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; आता होणार डॉक्टर
14
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
15
Jaipur Couple Video: रोमान्समध्ये इतके झाले तल्लीन की..., जयपूरमधील कपलचा हॉटेलमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
16
ENG vs IND : मॅच आधी एक मिनिटाचे मौन! टीम इंडियासह इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात (VIDEO)
17
Mumbai Local Fight: मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
18
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
19
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
20
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं

गतिमंद मुलाची ‘आधार’मुळे भेट

By admin | Updated: July 10, 2017 04:29 IST

तब्बल सहा वर्षांपूर्वी हरवलेला गतिमंद मुलगा आधार कार्डमुळे त्याच्या आई-वडिलांना भेटल्याची सुखद घटना येथे घडली

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर (धुळे) : तब्बल सहा वर्षांपूर्वी हरवलेला गतिमंद मुलगा आधार कार्डमुळे त्याच्या आई-वडिलांना भेटल्याची सुखद घटना येथे घडली. नांदेड जिल्ह्यातील सुगाव येथील रवी हा नऊ वर्षांचा मुलगा आणि श्रीपती व सुमनबाई वैद्य या माता-पित्यांचे १ जुलै रोजी हे सुखद पुनर्मीलन झाले. शिरपूर येथील गतिमंद मुलांच्या बालगृह अधिकाऱ्यांनी रविवारी ही आनंददायी घटना जाहीर केली. रवी शिरपूर येथील बालगृहात दाखल झाल्यानंतर कार्यालयीन कामकाजासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू करण्यात आली. आधार नोंदणी सक्तीची असल्यामुळे त्याची नोंदणी करताना यापूर्वीच रवी श्रीपती वैद्य या नावाने त्याची नोंद असल्याचे आॅनलाइन दिसून आले. त्याच्या पूर्वीचा आधार क्रमांक उपलब्ध झाला आणि त्याचा ठावठिकाणा सापडला. त्यावरून २५ जून २०१७ रोजी त्याच्या वडिलांचा शोध लागला़ त्याच्याआई-वडिलांना येथे बोलविण्यात आले़२०११ पासून बेपत्ता : सन २०११ मध्ये रवी बेपत्ता झाला होता़ औरंगाबाद शहरात एकटा फिरत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्याची रवानगी औरंगाबाद बालगृहात करण्यात आली. त्यानंतर रवीला डोंगरी-मुंबई येथील बालगृहात पाठविण्यात आले. पुढे वर्षभरानंतर संगोपन तसेच शिक्षणासाठी त्याला सरोळा, जि़ अहमदनगर येथील गतिमंद शाळेत पाठविण्यात आले. तेथून २०१४ मध्ये धुळे बालकल्याण समितीतर्फे स्व़ एऩ के़ झेड मराठे विधायक संस्था थाळनेर संचलित शिरपूर येथील गतिमंद मुला-मुलींच्या बालगृहात त्याला पुढील शिक्षणासाठी पाठविण्यात आले होते.