ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. २७ -   येथील पिंपरीतील श्री गुरुनानक दरबार गुरूद्वाराचे ग्यानी इंद्रजित सिंग (वय ८६) यांचे  अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे एक भाऊ आणि पुतण्या असा परिवार आहे. 
पिंपरी येथील श्री गुरुनानक दरबार गुरूद्वाराचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. पुण्यातील एका खाजगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. घरी आणले असता त्यांची प्राणज्योत मालवली. आज दुपारी त्याची अंतयात्रा निघणार आहे. त्यामुळे पिंपरी कॅम्पातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती.