शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

गुटख्यावर पुन्हा बंदी

By admin | Updated: July 20, 2014 01:13 IST

गुटखा आणि पानमसाल्यावर घातलेली बंदी राज्य सरकारने आणखी एक वर्षाने वाढवली आहे. गुटखा बंदीत वर्षभराची वाढ केल्याची माहिती अन्न प्रशासनाचे नागपूर विभागाचे सहआयुक्त शिवाजी देसाई यांनी

एक वर्षाने वाढ : विभागात ६ हजार तपासण्यानागपूर : गुटखा आणि पानमसाल्यावर घातलेली बंदी राज्य सरकारने आणखी एक वर्षाने वाढवली आहे. गुटखा बंदीत वर्षभराची वाढ केल्याची माहिती अन्न प्रशासनाचे नागपूर विभागाचे सहआयुक्त शिवाजी देसाई यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली. गुटख्यामुळे तोंडातील कर्करोगाचे वाढते प्रमाण पाहता बंदी वाढविली आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये सरकारने गुटखा आणि पानमसाल्यावर बंदी घातली होती. बंदीचा कालावधी १८ जुलैला संपला असून त्याआधीच १५ जुलैला राज्य शासनाने अध्यादेश काढला आहे. राज्य सरकारने १८ जुलै २०१२ मध्ये गुटख्याचा साठा, वितरण आणि विक्रीवर बंदी घातली होती. त्यानंतर एक वर्षाने वाढविली. आता यावर्षी पुन्हा निर्णय घेत बंदी एक वर्षाने वाढविण्यात आल्याचे देसाई म्हणाले. नागपूर विभागात ६ हजार तपासण्यागुटख्यावरील बंदीनंतर नागपूर विभागाने दोन वर्षात नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या जिल्ह्यामध्ये ५९७३ तपासण्या केल्या. एकूण १६२ प्रकरणांमध्ये जप्ती केली तर ६६ प्रकरणांमध्ये एफआयआर नोंदविला. कारवाईत २ कोटी १२ लाख ५१ हजार रुपये किमतीचा साठा जप्त केला. ५२ प्रकरणे खटले दाखल करण्यासाठी प्रलंबित आहेत. २० जुलै २०१३ ते १८ जुलै २०१४ या कालावधीत नागपूर विभागात २२७१ पेढ्यांची तपासणी करून ३९ प्रकरणांमध्ये १ कोटी ४१ लाख ४६ हजार रुपयांचा साठा जप्त केला. त्याआधीच्या वर्षात नागपूर विभागात २० जुलै २०१२ ते १९ जुलै २०१३ या दरम्यान ३६८५ पेढ्यांची तपासणी करून ७० लाख ७५ हजार रुपयांचा गुटखा जप्त केल्याचे देसाई यांनी सांगितले. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अन्न सुरक्षा आयुक्तांच्या अधिसूचनेनुसार गुटखा, पानमसाला, स्वादिष्ट किंवा सुगंधित तंबाखू, स्वादिष्ट किंवा सुगंधित सुपारी, खर्रा या स्वरूपात किंवा अन्य कोणत्याही नावाने संबोधली जाणारी किंवा ग्राहकाला मिश्रण करण्यास सहजरीत्या सुलभ होईल, अशा रीतीने तयार केलेल्या उत्पादनाची निर्मिती, साठवण, वितरण किंवा विक्रीस बंदी आहे. आतापर्यंत देशात २६ राज्यांनी गुटखा खरेदी-विक्रीवर बंदी घातली आहे.पाच केंद्रशासित प्रदेशांमध्येही गुटखा विक्रीवर बंदी आहे. पत्रपरिषदेत अन्न प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त एन.आर. वाकोडे आणि अन्न सुरक्षा अधिकारी अभय देशपांडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)