शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

व-हाड्यांसोबतच गुरानांही गाव पंगत!

By admin | Updated: March 19, 2017 02:19 IST

शेतकर्‍याची भूतदया; परिसरात निर्माण केला आदर्श.

अनिल गवई/खामगाव, दि. १८- जीवेभावे शिव सेवा हा संत गजानन महाराजांचा मंत्र अंगीकारकरुन हिवरखेड येथील एका शेतकर्‍यांने मुलाच्या लग्नात वर्‍हाडी, गावकर्‍यांसह आणि गावातील गुरांनाही घास भरविला. पाचहजारावर नागरिकांसह गावातील १६00 गुरांना दिलेली ही अनोखी 'पंगत' परिसरात चर्चेत आली असून चारा टंचाईच्या काळात आगळी भूतदया जोपासली आहे. खामगाव तालुक्यातील हिवरखेड येथील श्रीकृष्ण कांडेलकर शेतीसह गोपालनाचाही जोडधंदा करतात. त्यांच्या मुलगा जीवन याचा विवाह शनिवारी आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे त्यांनी हिवरखेड येथील समस्त नागरिकांना त्यांच्याकडील गुराढोरांसह मुलाच्या लग्नाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. नवरदेव पारावर पोहोचण्यापूर्वीच गुरांसाठी एका शेतात तसेच गावालगत असलेल्या खुल्या जमिनीवर चार्‍याची व्यवस्था करण्यात आली. काही जनावरांना हिरवा चाराही देण्यात आला. तर दुभत्या जनावरांसाठी ढेप आणि इतर पशुखाद्याचा वापर करण्यात आला. त्यानंतर ग्रामदैवत श्री बिंद्रावन बाबांच्या मंदिरात श्रीकृष्ण त्र्यंबक कांडेलकर यांचा जीवन नामक मुलगा आणि मोताळा तालुक्यातील खरबडी येथील समाधान इंगळे यांची कन्या अश्‍विनी हिचा विवाह पार पडला. विवाह सोहळ्यानंतर लग्नासाठी उपस्थित असलेले वर्‍हाडी आणि गावकर्‍यांसाठी जेवणाची पंगत देण्यात आली. नऊ ट्रॉली चार्‍याची व्यवस्था गावातील सुमारे १६00 जनावरांसाठी नऊ ट्रॉली चार्‍याची व्यवस्था कांडेलकर यांच्याकडून गावठाणावर करण्यात आली होती. यामध्ये हिरव्या चार्‍यासह ढेपेचा समावेश होता.