शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

गोळी झाडून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न

By admin | Updated: June 30, 2016 01:45 IST

नवीन गाळ्यांच्या बांधकामास अडथळा येणाऱ्या हॉटेलमध्ये कोणतेही बदल करायचे नाही

पुणे : नवीन गाळ्यांच्या बांधकामास अडथळा येणाऱ्या हॉटेलमध्ये कोणतेही बदल करायचे नाही, या कारणावरून मंगळवारी (दि. २८) नसरापूर येथील गजानन कदम या तरुणाने लहू शेलार (रा. हातवे, सध्या रा. माळेगाव) याच्या कपाळावर पिस्तूल लावून गोळी झाडली. शेलारने हात ढकलल्याने गोळी पत्र्याला लागल्यामुळे त्याचा जीव वाचला.या घटनेनंतर घटनास्थळाला ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. नसरापूर गावातील एसटी स्थानकानजीक गजानन कदम याने ८ नवीन गाळ््यांचे बांधकाम सुरू केले आहे. या नवीन बांधकाम केलेल्या गाळ्यांकडे जाण्याकरिता नवीन रस्ता गजाननला पाहिजे होता.एसटीस्थानकाला लागून असलेल्या बनेश्वर विश्रांतीगृह या हॉटेलला शटर बसवायचे आहे, असे हॉटेलमालक गोरख धारबा खुटवड यांनी ठरवले होते. त्यानुसार खुटवड यांनी त्यांचे जावई नितीन शेलार यांना शटरचे काम करून घेण्यास सांगितल्यावरून जावई नितीन मोजमाप घेत असताना गजानन व त्याच्या ३ साथीदारांनी नितीनला हटकले होते. त्यामुळे नितीन शेलार याने काम थांबवले होते. सायंकाळी पावणेसहाच्या वेळेस नितीन शेलार याने त्याचा चुलतभाऊ लहू शेलार याला चहा पिण्यासाठी तेथे बोलावले. त्या वेळी हॉटेलमध्ये गोरख खुटवड चहा बनवित असताना गजानन त्याच्या साथीदारांसह तेथे येऊन तुला सांगितलेले कळत नाही का, असे म्हणून खुटवड यांना दमदाटी केली. त्या वेळी तेथे असलेल्या लहू शेलार याने भांडणे सोडवायला गेला असता लहू शेलार यालाच मारहाण करीत तू आमच्यामध्ये यायचे नाही, असे सांगत लहू शेलार याच्या कपाळावर जीवे मारण्यासाठी पिस्तूल लावली. तुला खलास करतो, असे म्हणून गोळी झाडत असताना लहूने गजाननचा हात ढकलला, त्यामुळे पिस्तूलमधील गोळी लहुच्या डोक्यावरून जाऊन पाठीमागील पत्र्यास लागली, अशी फिर्याद लहू शेलार यांनी राजगड पोलिसांना दिली आहे.(वार्ताहर) गजानन जिवराज कदम याला अटक करण्यात आली आहे, तर त्याचे ३ साथीदार राहुल चंद्रकांत पवार, आकाश गेनबा सूर्यवंशी व शुभम उत्तम निकम (सर्व जण रा. नसरापूर) यांनी घटनास्थळावरून पलायन केले आहे. घटनास्थळावर पिस्तुलात वापरलेल्या गोळीची पुंगळी पोलिसांनी ताब्यात घेतली असून गजाननवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.