शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

गुमास्ता कामगारांचा संप चिघळला

By admin | Updated: October 18, 2016 06:05 IST

मुंबईतील कपडा बाजारातील गुमास्ता कामगारांनी पुकारलेला बेमुदत संप सोमवारी चिघळला आहे.

मुंबई : मुंबईतील कपडा बाजारातील गुमास्ता कामगारांनी पुकारलेला बेमुदत संप सोमवारी चिघळला आहे. व्यापारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने येथील गुमास्ता कामगारांच्या मागण्यांवर ठोस निर्णय घेतला नाही, म्हणून बेमुदत संप मंगळवारी सुरू राहील, अशी माहिती मुंबई गुमास्ता युनियनचे संपतराव चोरगे यांनी दिली.चोरगे म्हणाले की, बोनस, ग्रॅज्युईटी, वेतनवाढ अशा विविध मागण्या कामगारांनी मालकांकडे केल्या आहेत. येथील कपड्याच्या पाच विविध बाजारांतील व्यापाऱ्यांच्या एकूण १३ संघटनांनी दुपारी बैठक बोलावली होती. मात्र त्यात कोणताही ठोस निर्णय झाला नाही. अद्याप मुंबई गुमास्ता युनियनला चर्चेसाठी बोलावलेले नाही. त्यामुळे मंगळवारी संप कायम राहील, असेही चोरगे यांनी सांगितले.गुमास्ता कामगारांच्या अनुपस्थित काही दुकानदारांनी दुकाने उघडली होती. मात्र ग्राहकांना दाखवलेल्या कपड्यांच्या घड्या घालणे आणि ग्राहकाची मर्जी सांभाळणे एकट्याला शक्य नसल्याने काही दुकानदारांनी दुपारी दुकाने बंद केली. त्यात येथील माथाडी कामगारांनीही संपात उडी घेत गुमास्ता कामगारांना पाठिंबा दर्शवला. त्यामुळे बाजाराबाहेरून कपड्यांचे गठ्ठे उचलून आणणे व्यापाऱ्यांना कठीण झाले. (प्रतिनिधी)>कामगारांचे शक्तीप्रदर्शनगुमास्ता कामगारांनी संपाचा पवित्रा घेतल्यानंतरही सोमवारी बहुतेक व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली होती. मात्र संतप्त कामगारांनी पाचही बाजारांच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर निदर्शने केली. यावेळी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र सायंकाळपर्यंत घोषणा देत कामगारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले.