शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांना जामीन मंजूर

By admin | Updated: June 18, 2016 17:53 IST

म्हसावद येथील पद्मालय शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मयत सभासद हजर असल्याचे दाखवत फसवणूक केल्याप्रकरणातील संशयित आरोपी गुलाबराव पाटीलांना जामीन मंजूर झाला आहे.

ऑनलाइन लोकमत

जळगाव, दि. १८ -  म्हसावद येथील पद्मालय शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मयत सभासद हजर असल्याचे दाखवत नवीन कार्यकारिणी गठीत करून फसवणूक केल्याप्रकरणी संशयित आरोपी शिवसेनेचे जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे आमदार गुलाबराव पाटील यांना आज न्यायालयाने जामीन मंजूर केला. जिल्हा व उच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्याने आमदार गुलाबराव पाटील हे १६ जून रोजी जळगाव येथील न्या.एस.पी. देवरे यांच्यापुढे शरण आले. त्यानंतर त्यांना न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्याची मुदत १७ रोजी संपल्याने पुन्हा त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर जामिनासाठी अर्ज केला असता त्रयस्थ अर्जदाराने त्यांच्या जामिनावर हरकत घेतली होती. न्यायालयाने १७ रोजी जामिनावर निर्णय दिला नव्हता, त्यामुळे गुलाबराव पाटील यांचा मुक्काम जिल्हा कारागृहात होता. १८ रोजी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. काय आहे प्रकरण?१९९१ मध्ये म्हसावदच्या पद्मालय शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेची स्थापना झाली होती. त्यानंतर २०१२ पर्यंत संस्थेचे ६ सभासद हे मयत झाले होते. असे असताना आमदार गुलाबराव पाटील यांनी २० एप्रिल २००८ रोजी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यासाठी अजेंडा काढला. त्यानंतर ३० एप्रिल २००८ रोजी ही सभा घेण्यात आली. संस्थेचे सभासद महारू काशीनाथ बेलदार हे १८ आॅगस्ट १९९६ रोजी मयत झालेले असताना ते सभेला हजर असल्याचे दाखवण्यात आले. तसा उल्लेख प्रोसेडिंगमध्ये करून सभेत नवीन कार्यकारिणी गठीत केली होती. याप्रकरणी अर्जुन लटकन पाटील यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून २०१२ मध्ये औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात गुलाबराव पाटलांसह ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.