धुळे : जळगाव घरकुल प्रकरणी माजी कृषी व परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांच्या जामिनाचे कागदपत्रे जिल्हा कारागृहाला प्राप्त झाल्यानंतर त्यांची बुधवारी सायंकाळी साडेसहानंतर सुटका झाली.देवकर यांना जामीन मंजूर झाल्यासंबंधी कागदपत्रे बुधवारी सायंकाळी पाच वाजता जिल्हा कारागृहाला प्राप्त झाली़ त्यानंतर सायंकाळी ६़३० वाजता देवकर यांना देवपूरमधील एका खासगी दवाखान्यातून वरीष्ठ तुरूंग अधिकारी एस़ पी़ भुतेकर यांनी सोडले़ त्यानंतर देवकर पुण्याला रवाना झाले, अशी माहिती जिल्हा कारागृह अधीक्षक बी़ आऱ मोरे यांनी दिली़ देवकर वर्षभरापासून जिल्हा कारागृहात होते़ त्यांना सर्वोच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे़ त्यांना धुळे व जळगाव येथे न्यायालयीन कामकाजाव्यतरिक्त प्रवेश बंदी आहे. त्यांना पुणे येथे रहिवासास परवानगी देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
गुलाबराव देवकर यांची जामिनावर सुटका
By admin | Updated: January 8, 2015 01:41 IST